मुंबईचा वरिष्ठ रणजी संघ शनिवारी (२१ ऑगस्ट) ओमानला पोहोचला आहे. मुंबईचा रणजी संघ ओमान दौऱ्यावर टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळणार आहे. शम्स मुलानी यांच्या नेतृत्वाखाली शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, मोहित अवस्थी इत्यादी खेळाडू मुंबईच्या पथकासोबत ओमानला पोहोचले आहेत. ओमानला पोहोचलेल्या मुंबई रणजी संघाच्या खेळाडूंनी रविवारी सरावास सुरुवात केली. यानंतर हे खेळाडू सोमवारी ओमानच्या संघाविरुद्ध पहिला सामना खेळतील. पहिला टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होईल.
ओमान संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी संघाला सराव सामने खेळायचे आहेत. म्हणून ओमानच्या क्रिकेट संघाने मायदेशात तीन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामने खेळण्यासाठी मुंबईच्या संघाला आमंत्रित केले आहे. ओमान संघ टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात सहभागी होणार आहे. ओमानच्या राष्ट्रीय संघाला सरावाची आवश्यकता असल्याने त्यांच्या सरावासाठी ही व्यवस्था केली गेली आहे. ओमान क्रिकेटचे प्रमुख पंकज खिमजी यांनी मुंबईच्या संघाला आपल्या देशात आमंत्रित करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
ओसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दुलीप मेंडिस यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) सचिव संजय नाईक यांना हे आमंत्रण पाठवले होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आमंत्रण स्वीकारले होते.
https://www.instagram.com/p/CSzmxZwr8ay/?utm_source=ig_web_button_share_sheet
या सामन्यामुळे दोन्ही संघांना फायदा होणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी ओमानला दर्जेदार सराव करता येईल आणि मुंबई संघाला भारतीय देशांतर्गत हंगाम सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय संघासोबत खेळण्याची संधी मिळेल. ओमानने टी-20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे आणि आयसीसी ओमानमध्ये स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सहा सामन्यांचेही आयोजन करणार आहे. भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता आयसीसी ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये आयोजित करत आहे, ज्याचे आयोजन बीसीसीआय करणार आहे.
https://www.instagram.com/p/CS4cFtwj4NU/?utm_source=ig_web_button_share_sheet
या सामन्यांमध्ये मुंबईकडून खेळणारे पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवसारखे खेळाडू खेळणार नाहीत. शॉ आणि सुर्यकुमार इंग्लंडमध्ये असल्याने खेळणार नाहीत आणि श्रेयस अय्यर इंडियन प्रीमियर लीगसाठी यूएईला गेला आहे.
असा आहे भारतीय संघ
शम्स मुलानी (कर्णधार), शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, मोहित अवस्थी, चिन्मय सुतार, सुजित नाईक, हार्दिक तमोरे, आकाश गोमेल, अमन खान, साईराज पाटील, धुर्मिल मतकर, दीपक शेट्टी, अरमान जाफर, शशांक अत्तरदे
मुंबई वि. ओमान टी-20 वेळापत्रक
मुंबई वि. ओमान – पहिला टी20 – 23 ऑगस्ट – दुपारी 1:30 (भारतीय वेळेनुसार)
मुंबई वि ओमान – दुसरा टी20 – 24 ऑगस्ट – दुपारी 1:30 (भारतीय वेळेनुसार)
मुंबई वि. ओमान एकदिवसीय वेळापत्रक
मुंबई वि. ओमान – पहिला वनडे – 26 ऑगस्ट – सकाळी 10 (भारतीय वेळेनुसार)
मुंबई वि. ओमान – दुसरा एकदिवसीय – 31 ऑगस्ट – सकाळी 10 (भारतीय वेळेनुसार)
मुंबई वि.ओमान – तिसरा एकदिवसीय – 03 सप्टेंबर – सकाळी 10 (भारतीय वेळेनुसार)
महत्त्वाच्या बातम्या-
युएईला जाण्याआधीच बिघडणार आरसीबीचं गणित! हसरंगा-चमिराच्या खेळण्यावर टांगती तलवार
चलो यूएसए! मनन, उन्मुक्तनंतर आता ‘हा’ दिल्लीकर खेळणार अमेरिकेत, भारतीय क्रिकेटला केला रामराम
‘कोहलीची आक्रमकता मर्यादित असायला हवी, नाहीतर…,’ नेमकं असं का म्हणाले माजी क्रिकेटर





