MI vs GT Eliminator: एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला. (Mumbai Indians defeated Gujarat Titans by 20 runs.) यासह, मुंबई इंडियन्सने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे, जिथे त्यांचा सामना पंजाब किंग्जशी होईल. एलिमिनेटर सामन्यात, प्रथम खेळणाऱ्या मुंबईने 228 धावांचा मोठा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात, गुजरातला शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या सामन्यात फक्त 208 धावा करता आल्या. रोहित शर्मा आणि साई सुदर्शन यांनी या सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी केली.
मुंबई इंडियन्स आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचली आहे. (1 जून) रोजी क्वालिफायर-2 सामन्यात मुंबई इंडियन्स पंजाब किंग्जशी सामना करेल. (MI vs PBKS Qualifier 2) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सला 228 धावांचे लक्ष्य मिळाले. गुजरातची सुरुवात खूपच खराब झाली कारण कर्णधार शुबमन गिल फक्त 1 धाव काढल्यानंतर बाद झाला. (Shubman Gill Wicket) त्यानंतर साई सुदर्शन आणि कुसल मेंडिस यांनी मिळून 64 धावा जोडल्या, परंतु 20 धावा काढल्यानंतर मेंडिस बाद झाला.
साई सुदर्शनने वॉशिंग्टन सुंदरसोबत मिळून 84 धावांची जलद भागीदारी केली, पण गुजरातचा विजय निश्चित करू शकला नाही. सुंदरने 24 चेंडूत 48 धावांची तुफानी खेळी केली. सुंदर बाद झाल्यानंतर गुजरातने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. शेरफेन रदरफोर्ड 24 धावा करून बाद झाला आणि शाहरुख खान 13 धावा करून बाद झाला. त्याच वेळी, सेट असूनही राहुल तेवतिया केवळ 16 धावा करू शकला.
साई सुदर्शनने एलिमिनेटर सामन्यात 49 चेंडूत 80 धावांची खेळी खेळून गुजरातच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. सुदर्शनने त्याच्या खेळीत 10 चौकारांसह 1 षटकार मारला. परंतु त्याची दमदार खेळी रोहित शर्माच्या 81 धावांवर मात करू शकली नाही. रोहितने 50 चेंडूत 81 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 9 चौकारांसह 4 षटकार मारले.
यासह मुंबई इंडियन्सने क्वालिफायर 1 मध्ये प्रवेश केला. आता क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्जशी होईल. दरम्यान दोन्ही संघ (1 जून) रोजी अहमदाबादच्या मैदानावर आमने-सामने असतील. या सामन्यात जो संघ बाजी मारेल तो संघ फायनलमध्ये आरसीबी संघाशी सामना करताना दिसेल. जो सामना (3 जून) रोजी होणार आहे.
????????-???????????????? effort on a ????????-???????????????? occasion ????@mipaltan seal the #Eliminator with a collective team performance ✌
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
Scorecard ▶ https://t.co/R4RTzjQNeP#TATAIPL | #GTvMI | #TheLastMile pic.twitter.com/cJzBLVs8uM






