---Advertisement---

आता कोण रोखणार.. ! एक खास योगायोग पुन्हा जुळून आला तर मुंबईचे विजेतेपद पक्के

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये मुंबई इंडियन्स सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. शनिवारी (31 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 9 गडी राखून पराभव केला. गुणतालिकेत 18 गुणांसह हा संघ पहिल्या स्थानावर आहे. मात्र, एका खास कारणामुळे मुंबई संघ आयपीएल 2020 चा खिताब जिंकणार अशी जोरदार चर्चा आहे.

प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा ठरला पहिलाच संघ
प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा मुंबई हा पहिलाच संघ ठरला आहे. मुंबई सध्या 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे मुंबई प्ले ऑफ फेरीत होणारा पहिला क्वालिफायर सामना खेळणार आहे.

योगायोग आला जुळून
मुंबई संघाच्या बाबतीत एक योगायोग जुळून आला आहे. जेव्हा जेव्हा मुंबई इंडियन्सने क्वालिफायरचा पहिला सामना खेळला आहे तेव्हा त्यांनी नेहमीच आयपीएल करंडक जिंकला आहे. मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 क्वालिफायरचा पहिला सामना खेळला होता आणि या चारही वर्षांत आयपीएल करंडक जिंकला होता. आता या वेळेसही मुंबई क्वालिफायर 1 खेळणार आहे, अशा परिस्थितीत संघ पुन्हा एकदा चॅम्पियन बनणार का हे पाहावं लागेल.

खिताब जिंकण्याचा प्रबळ दावेदार
मुंबई इंडियन्स यंदा आयपीएल जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. या हंगामात मुंबईचा गोलंदाज आणि फलंदाज या दोघांनीही उत्तम खेळ दाखविला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मुंबई इंडियन्सचे खेळाडू (जे आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळलेले नाहीत) उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.

बुमराहने घेतले सर्वाधिक बळी
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या हंगामात सर्वाधिक 23 बळी घेतले आहेत. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनेही 13 सामन्यांत 20 बळी घेतले आहेत.

क्विंटन डीकॉकने केल्या सर्वाधिक धावा
सलामीवीर क्विंटन डिकॉकने मुंबईकडून सर्वाधिक 418 धावा केल्या आहेत. युवा फलंदाज इशान किशनने 395 आणि अनुभवी सूर्यकुमार यादवने 374 धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---