इंडियन प्रीमियर लीग आयपीएल 2025च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने एक मोठी घोषणा केली आहे. टीम मॅनेजमेंटने आपल्या संघात इंग्लंडच्या एका यशस्वी प्रशिक्षकाचा समावेश केला आहे. मुंबई इंडियन्सने 43 वर्षीय कार्ल हॉपकिन्सन यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या हॉपकिन्सनने इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात दीर्घकाळ काम केले आहे. ज्यात तो यश्सवी देखील झाला आहे. 2018 ते या वर्षापर्यंत ते इंग्लंडचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. जवळपास सहा वर्षे इंग्लंड संघासोबत काम केल्याने. त्यांना खूप चांगला अनुभव आहे.
इंग्लंडसोबत 6 वर्षे घालवताना हॉपकिन्सन दोनदा जगज्जेताही झाला आहे. इंग्लंडने 2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2022 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता. तेव्हा दोन्ही वेळा तो संघासोबत होता. 2022 मध्ये कार्ल हॉपकिन्सन 19 वर्षाखालील संघासह 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतही गेला होता. ज्यामध्ये त्याच्या कोचिंगमध्ये संघ उपविजेता म्हणून परतला होता.
🚨 𝑩𝑹𝑬𝑨𝑲𝑰𝑵𝑮 🚨
Mumbai Indians have appointed former England player Carl Hopkinson as their new fielding coach for the upcoming IPL 2025 season 🔵🏏#MumbaiIndians #IPL2025 #CarlHopkinson #Sportskeeda pic.twitter.com/owY3jZSvtE
— Sportskeeda (@Sportskeeda) December 13, 2024
हॉपकिन्सन यांनी कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही आणि वयाच्या 29 व्या वर्षी प्रशिक्षकपदाला सुरुवात केली. हॉपकिन्सन आपल्या (त्यांच्या) काळात खूप चांगले क्षेत्ररक्षक होते. त्यामुळे ते क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनले आणि त्यानंतर त्यांना 2018 मध्ये इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून कॉल आला. क्रिकेटपटू म्हणून त्यांची कारकीर्द फारशी यशस्वी नसली तरी प्रशिक्षक म्हणून तो सातत्याने यशाची नवीन शिखरे गाठत आहे.
हेही वाचा-
विराट कोहली गाबामध्ये पूर्ण करणार ‘अनोखं शतक’, सचिननंतर अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा खेळाडू!
IND vs AUS: टीम इंडियाने गाबा कसोटीत सलामीची जोडी बदलावी? या दोन कारणांमुळे बदलाची शक्यता
“सचिन तेंडुलकरने मला मदत….”, विनोद कांबळीचा मोठा खुलासा