इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्स संघाला ओळखले जाते. मुंबई संघ आयपीएल २०२२मध्ये सपशेल फ्लॉप ठरला आहे. त्यांचा शेवटचा सामना शनिवारी (दि. २१ मे) दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध खेळला जाणार आहे. या सामन्यात तरी अर्जुन तेंडुलकर याला मुंबईच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. कर्णधार रोहित शर्मा याने संकेत दिले होते की, अंतिम सामन्यात काही नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे. आतापर्यंत १३ सामन्यांमध्ये २२ खेळाडू खेळले आहेत. अशात या सामन्यात सर्वांची उत्सुकता असेल की, दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला शेवटचा सामना खेळायला मिळतो की, नाही. कारण, तो दोन्ही हंगामात २७ सामन्यांत बाकावर बसला आहे.
अशात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याची शानदार गोलंदाजी पाहायला मिळत आहे. व्हिडिओत अर्जुन यॉर्कर चेंडू फेकण्याचा सराव करत आहे. विशेष म्हणजे, अर्जुनचे सर्व चेंडू योग्य जाग्यावर पडत आहेत आणि एकदम परफेक्ट यॉर्कर चेंडू फेकत सर्वांना हैराण करत आहे.
View this post on Instagram
सराव सत्रात अर्जुन चांगली गोलंदाजी करत आहे. त्यामुळे हे पाहणे रंजक ठरेल की, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या मुलाला संधी मिळते की, नाही. असे होऊ शकते की, जयदेव उनाडकटच्या जागी अर्जुनला प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील केले जाईल. मात्र, आता हे सर्व नाणेफेकीवेळीच समजेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई इंडियन्स संघाची हंगामातील कामगिरी
मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत या हंगामात १३ सामने खेळले आहेत. यापैकी फक्त ३ सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे, तर दुसरीकडे त्यांना १० सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: २२ वर्षांच्या गोलंदाजावरही अश्विनला नाही आली दया, गुडघ्यावर बसून मारला ९७ मीटरचा सिक्स
माहीची क्रेझ! चालू सामन्यादरम्यान चाहत्याची धोनीकडे धाव, मग अंपायरने केले असे काही
धोनी पुढल्यावर्षी खेळतोय, हे समजताच गावसकरांनी दिली कोट्यवधी थालाप्रेमींच्या मनातली प्रतिक्रिया