Suryakumar Yadav Heartbreaking Emoji: सध्या भारतीय क्रिकेटविश्वात एकाच गोष्टीची चर्चा रंगली आहे. ती म्हणजे, मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्मा याला हटवून हार्दिक पंड्या याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. मुंबईच्या या निर्णयाचा चाहत्यांकडून जोरदार विरोध केला जात आहे. कुणी मुंबईची जर्सी जाळत आहे, तर कुणी टोपी जाळून याचा विरोध करत आहे. अशातच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने त्याच्या एका पोस्टने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. त्याच्या या पोस्टचा वेगवेगळा अर्थ काढला जात आहे.
सूर्यकुमार यादवची पोस्ट
खरं तर, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून हृदय तुटल्याचा इमोजी शेअर केला आहे. मात्र, त्याने ही पोस्ट शेअर करताना त्याच्यासोबत काहीही लिहिलेले नाहीये. मात्र, त्याच्या या पोस्टवर चाहते जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी असे म्हटले आहे की, सूर्या रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कर्णधारपदावरून हटवण्याविषयी व्यक्त झाला आहे. तसेच, काहींनी असेही म्हटले आहे की, सूर्याला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार बनवले नाही, म्हणून त्याचे हृदय तुटले आहे.
https://twitter.com/surya_14kumar/status/1735886487869153517
मुंबईचा हैराण करणारा निर्णय
मात्र, सूर्याच्या या पोस्टचा अर्थ काय आहे, हे याचे उत्तर सूर्याच देऊ शकतो. खरं तर, शुक्रवारी (दि. 15 डिसेंबर) मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरून हटवले. फ्रँचायझीने स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या याला मुंबईचा नवीन कर्णधार घोषित केले. विशेष म्हणजे, यापूर्वी अशाही चर्चा होत्या की, रोहितनंतर मुंबईची सूत्रे सूर्याच्या हाती सोपवली जातील. मात्र, मुंबईने पंड्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी दिल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
बरोबरीत सोडवली मालिका
नुकतीच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमारकडे होते. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तसेच, दुसऱ्या सामन्यात यजमान आफ्रिकेने बाजी मारली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने 106 धावांनी मोठा विजय मिळवला. तसेच, मालिका बरोबरीत सोडवली. विशेष म्हणजे, मालिकेतील अखेरच्या सामन्यात सूर्याने विक्रमी शतकही ठोकले होते. (mumbai indians batter suryakumar yadav posted a heartbreaking emoji on his social media platforms fans shocked)
हेही वाचा-
एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं! Rohit Sharmaच्या चाहत्यांनी उचललं धक्कादायक पाऊल, मुंबईचं मोठं नुकसान
टीम इंडियाबाबत धक्कादायक BREAKING! एकाने स्वत: काढून घेतलं नाव, तर दुसरा कसोटी मालिकेतून बाहेर; लगेच वाचा






