---Advertisement---

‘त्या’मुळे आयपीएलची पहिली कमाई वडिलांच्या हाती सोपवली, मुंबईकर तिलकच्या निर्णयामागे कौतुकास्पद कारण

On: शनिवार, जून 11, 2022 10:20 PM
Tilak-Varma
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले. पण त्यांच्या संघातील काही युवा खेळाडूंनी मात्र चमकदार कामगिरी केली. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेत तो म्हणजे तिलक वर्माचा. तिलकचा इथपर्यंतचा प्रवास खडतर राहिला आहे. पण आता त्याचा पुढचा प्रवासा काहीसा सुखकर वाटत आहे. कारण आयपीएलधील प्रदर्शनासाठी त्याला मुंबई संघाकडून चांगला मोबदला मिळाला आहे. परंतु त्याने या पैशांमुळे स्वतःच्या खेळावर दुर्लक्ष होऊ नये, यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई संघासाठी खराब गेलेल्या आयपीएलच्या या हंगामात तिलकने मात्र चांगले प्रदर्शन केले आणि पुढच्या हंगामासाठी संघात स्वतःचे स्थान सुरक्षित केले. मुंबई इंडियन्समध्ये जागा मिळवण्यापूर्वी तिलक वर्मा (Tilak Varma) अनेक अडचणींचा सामना करून इथपर्यंत पोहोचला आहे. त्याने एका प्रोफेशनल क्रिकेटपटू बनण्यासाठी सुरुवातीच्या काळात काय संघर्ष केला याविषयी माहिती दिली आहे. मुंबईने त्याला मेगा लिलावात १.७० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये त्याने ३९४ धावा केल्या.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना तिलक म्हणाला की, “तेव्हा एक नोकरी असणे आणि नियमित पगार महत्वाचा होता. माझ्याकडे आज जे आहे, ते मिळवण्यासाठी मला ज्या गोष्टी सोडाव्या लागल्या आहेत, त्या मी कधीच विसरणार नाही. मी त्या सर्व कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये, एका जवळच्या बहिणीच्या लग्नाला आणि माझ्या आई-वडिलांसोबत वेळ घालवू शकलो नाही.”

पुढे तो म्हणाला की, “सर्वात वाईट गोष्ट ही होती की, माझ्या मोठ्या क्रिकेट कीटला बसमध्ये घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. जेव्हा कधी मी कीट माझ्यासोबत घेऊन जायचो, तेव्हा नेहमी गोंधळ व्हायचा. पण आता माझ्याकडे स्वतःची गाडी खरेदी करण्याइतके पैसे आहेत. मी १६ वर्षाखालीस संघाचा स्थायी सदस्य बनण्यासाठी खूप प्रयत्न केले. मी सकाळी लवकर मैदानात पोहोचायचो आणि सायंकाळी उशिरापर्यंत तिथेच असायचो. मी राज्याच्या कॅम्पचा एकही दिवस सोडला नाही. मी जेवण आणि आराम करत नव्हतो आणि पूर्णपणे निराश होऊन जायचो.”

आयपीएलमध्ये मिळालेल्या पैशामुळे खेळावरचे लक्ष विचलित होऊ नेये यासाठी तिलकने सर्व पैसे वडिलांकडे सोपवले आहेत. तो म्हणाला की, “मी पैशांमुळे माझे डोके प्रभावित होऊ देत नाहीये. मी सर्वे पैसे माझ्या वडीलांना दिले आहेत आणि त्यांना सांगितले आहे की, मला यापासून दूर ठेवा. मला माहिती आहे की, लक्ष विचलित होणे खूप सोपे आहे.”

दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२२ हंगाम एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे होते. हंगामातील पहिल्या ८ सामन्यांपैकी एकही सामना संघाने जिंकला नव्हता. गुणतालिकेत त्यांचा संघ सर्वात शेवटच्या स्थानावर होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

होऊदे खर्च! आयपीएल संपल्यानंतर आंद्रे रसेलने घेतली नवीन लग्जरी कार, किंमत माहितीय का?

टी२० क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालतेय ‘बटलरशाही’, वाचा इंग्लंड संघाचा आधारस्तंभ असलेल्या ‘जोस द बॉस’चा प्रवास

मागं-पुढं न बघता, जेव्हा विराट गेलेला गंभीरच्या अंगावर धावून, नेमंक काय घडलं होतं?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---