मुंबई इंडियन्सच्या नावाचा दबदबा केवळ आयपीएलमध्येच नाही तर इतर लीगमध्येही कायम आहे. तसेच मुंबईने पुन्हा एकदा चमत्कार केला असुन मुंबई फ्रँचायझी ILT20 मध्ये चॅम्पियन बनली आहे. मुंबई फ्रँचायझीची ही 10वी ट्रॉफी आहे. यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा मुंबई पलटणचा आवाज घुमू लागला आहे. मुंबईने दुबई कॅपिटल्सचा 45 धावांनी पराभव करत ट्रॉफी जिंकली आहे. या सामन्यात निकोलस पुरनने अप्रतिम कामगिरी केली होती. यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला आहे.
याबरोबरच, ILT20 चा अंतिम सामना 17 फेब्रुवारीला एमआय एमिरेट्स आणि दुबई कॅपिटल्स यांच्यामध्ये रात्री 8 वाजता खेळवण्यात आला होता. तर हा अंतिम सामना दुबईच्या मैदानावर खेळला गेला. तसेच दुबई कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई संघाने अवघ्या 3 विकेट्समध्ये 208 धावा डोंगर उभा केला होता.
POST-MATCH REPORT🖋️
Grand Finale of Season 2 of #DPWorldILT20
The MI Emirates are the champions of DP World ILT20 Season 2!
The MI Emirates registered an impressive 45-run victory in the final against the Dubai Capitals. Put into bat first, the MI Emirates amassed a… pic.twitter.com/xyEtvFFKVG
— International League T20 (@ILT20Official) February 17, 2024
यामध्ये मुंबईसाठी निकोलस पुरनने अवघ्या 27 चेंडूत 57 धावांची तुफानी खेळी केली. तर या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 6 षटकारही निघाले होते. याशिवायआंद्रे फ्लेचरनेही 37 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी केली होती. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 200 पार झाली. आतादुबई कॅपिटल्सला सामना आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी 120 चेंडूत 209 धावांचे लक्ष देण्यात आले होते.
अंतिम सामन्यात धावांचा पाठलाग करताना दुबई कॅपिटल्सचा डाव सुरुवातीपासूनच डगमगताना दिसत होता. तसेच दुबईने शून्य धावसंख्येवर आपली पहिली विकेट गमावली होती. दुबईकडून एकाही फलंदाजाने अर्धशतकी केले नाही. तसेच दुबई कॅपिटल्स कडून सॅम बिलिंगने 29 चेंडूत 40 धावांची सर्वाधिक खेळी खेळली आहे. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 2 षटकारही मारले आहेत. अशाप्रकारे दुबई संघाला 20 षटकांनंतर 7 विकेट गमावून केवळ 167 धावा करता आल्या. तर मुंबईसाठी विजयकांत व्यासकांत आणि ट्रेंट बोल्ट यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत दोन्ही खेळाडूंनी 2-2 विकेट्स घेतल्या आहेत.
Big achievements need big celebrations! 🎊🤩#DPWorldILT20 #AllInForCricket #MIEvDC pic.twitter.com/E1hhoXhxbe
— International League T20 (@ILT20Official) February 17, 2024
दरम्यान, मुंबईची ही 10वी ट्रॉफी असून मुंबईने 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. तसेच 2 CLT 20 ट्रॉफी त्याच्या नावावर आहेत. तर 1 WPL ट्रॉफी जिंकली आहे. MLC ट्रॉफी जिंकली होती आणि आता आणखी एक ILT20 ट्रॉफी देखील जिंकली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : यशस्वी राजकोट कसोटीत पुन्हा करणार फलंदाजी? घ्या जाणून ICC चा नियम
- IND vs ENG । ‘अरे आपल्यासोबत ‘ते’ होईल’, रोहितचं बोलणं ऐकून तुम्हालाही पडेल प्रश्न, मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल