इंडियन प्रीमियम लीग २०२१ च्या प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राजस्थान रॉयल्सला मोठ्या फरकाने पराभूत केल्यानंतर संघाने नेट रनरेटमध्येही थोडी सुधारणा केली आहे. यामुळे सध्या कर्णधार रोहित शर्माही खूप खूश आहे. दरम्यान, रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो भारताच्या दोन महान खेळाडूंची नकल करतांना दिसत आहे.
रोहित शर्मा त्याच्या चाहत्यांना सांगत आहे की, ओळखा हे कोणते क्रिकेटपटू आहेत? पृथ्वी शॉ, राशीद खान इत्यादी क्रिकेटपटूंनी व्हिडिओवर कमेंट करून आपआपली उत्तरे दिली आहेत.
रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दोन खेळाडूंची नकल करतांना दिसत आहे. पहिल्या क्रमांकावर तो सचिन तेंडुलकरच्या फलंदाजी शैलीची नकल करत आहे. दुसऱ्या क्रमांकावर केलेला अभिनय पाहून तो हरभजन सिंगची नकल करत असल्याचे स्पष्ट होत आहे. तो पहिल्या क्रमांकावर ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, हे पाहून पृथ्वी शॉने राहुल द्रविडच्या नावाचा अंदाज लावला. त्याचवेळी राशीद खानने महेला जयवर्धनेचे नाव घेतले.
तत्पूर्वी, राजस्थानसोबत झालेल्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या गोलंदाजानी भेदक गोलंदाजी करत राजस्थानच्या संघाला अवघ्या ९० धावांवर रोखले होते. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाने अतिशय खराब फलंदाजीचे प्रदर्शन केले. राजस्थानकडून सर्वाधिक धावा सलामीवीर एविन लुईसने केल्या, तो २४ धावा करून बाद झाला. लुईस बाद झाल्यानंतर राजस्थानचा एकही फलंदाजाला मुंबईसमोर तग धरू शकला नाही. कर्णधार संजूही फक्त ३ धावा करुन बाद झाला.
https://www.instagram.com/reel/CUrw8maDcbj/?utm_medium=copy_link
लुईसशिवाय यशस्वी जयस्वालने १२ धावा केल्या, मिलरने १५ धावा केल्या तर तेवतिया १२ धावा करून बाद झाला. श्रेयस गोपाल शून्य धावांवर बाद झाला. इतर फलंदाज दुहेरी संख्याही गाठू शकले नाहीत. मुंबईकडून उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. नाथन कुल्टर नाईलने ४, जेम्स नीशामने ३ आणि बुमराहने २ विकेट्स घेतल्या.
मुंबईसमोर ९१ धावांचे सोपे लक्ष्य असताना मुंबईचा सलामीवीर कर्णधार रोहितने चांगली सुरुवात केली. पण तो २२ धावावर बाद झाला, त्याला चेतन सकारियाने बाद केलं. त्यानंतर सूर्यकुमारही १३ धावा करुन बाद झाला. मुस्तफिजूरने त्याची विकेट घेतली. पण सलामीवीर इशान किशन मात्र एका बाजूने तुफानी फलंदाजी करतच राहिला. त्याने अवघ्या २५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार ठोकत ५० धावा केल्या आणि मुंबईला अवघ्या ८.२ षटकांमध्ये विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटचे खास असूनही दुर्लक्ष, दुधातून माशी काढावी तसे ‘या’ ३ खेळाडूंना टी२० विश्वचषकातून ठेवले बाहेर
जमतंय जमतंय! धनश्रीच्या तालात ताल मिसळत पंजाबी गाण्यावर थिरकला चहल, व्हिडिओला चाहत्यांची पसंती
क्रिकेटपटू, यष्टीरक्षक आणि कर्णधारानंतर एमएस धोनी दिसणार अभिनेत्याच्या भूमिकेत? दिले ‘असे’ उत्तर