मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 साठी मुख्य प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज मार्क बाउचर यांची नियुक्ती केली आहे. त्यांना माहेला जयवर्धने यांच्याजागी निवडले गेले आहे. जयवर्धने यांच्यावर मुंबईसह 3 फ्रँचायझींच्या प्रदर्शनात सुधारणा करण्याची जबाबदारी सोपवली गेली आहे. त्यामुळे आता आगामी हंगामात बाउचर आणि कर्णधार रोहित शर्मा यांची नवी जोडी मैदानात दिसेल.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित (Rohit Sharma) याला संघाची कमान मिळाल्यानंतर मुंबई फ्रँचायझीने 4 प्रशिक्षक बदलले आहेत. जॉन राईट, रिकी पाँटिंग, माहेला जयवर्धने आणि आता मार्क बाउचर (Mark Boucher) यांचे नाव या यादीत जोडले गेले आहे.
न्यूझीलंडचे प्रतिभाशाली सलामीवीर आणि दिग्गज क्रिकेटपटू जॉन राईट यांनी 2013 आणि 2014 साली मुंबई संघाच्या प्रशिक्षणाची धुरा सांभाळली होती. त्यांच्याच प्रशिक्षणाखाली मुंबई संघाने पहिल्यांदा 2013 मध्ये आयपीएल चषक उंचावला होता. याचवर्षी रोहितच्या हाती मुंबई संघाचे नेतृत्त्वपद सोपवण्यात आले होते.
त्यानंतर रिकी पाँटिंग यांनी मुंबई संघाला प्रशिक्षणाचे धडे दिले होते. ते 2015 आणि 2016 अशी 2 वर्षे संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. यादरम्यान 2015 मध्ये मुंबईचा संघ विजेता बनला होता. मग मुंबई संघ आणि कर्णधार रोहितला श्रीलंकन दिग्गजाची साथ मिळाली. श्रीलंकेचे महान खेळाडूंपैकी एक माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) हे 2017 मध्ये मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी रुजू झाले. त्यांनी 2017 ते 2022 दरम्यान मुंबई संघाला प्रशिक्षण दिले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली मुंबईचा संघ 3 वेळा आयपीएल विजेता बनला. 2017, 2019 आणि 2020 अशी 3 वर्षे मुंबईने जयवर्धनेंच्या प्रशिक्षणाखाली चषक जिंकला आहे.
अशाप्रकारे रोहित कर्णधार बनल्यापासून अर्थात मागील 9 वर्षांत मुंबई संघाला 4 वेगवेगळे प्रशिक्षक लाभले आहेत, मात्र आणखी रोहितच्या जागेला कोणीही धक्का लावू शकलेला नाही.
रोहित शर्माची आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून कामगिरी
रोहितने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून आतापर्यंत 143 सामने खेळले आहेत. यापैकी 79 सामने संघाने जिंकले आहेत, तर 60 सामन्यात पराभव झाला आहे. 4 सामने बरोबरीत सुटले आहेत. रोहितची विजयी सरासरी 56.64 टक्के आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मार्क बाउचर बनले मुंबई इंडियन्सचे सातवे महागुरू, यापूर्वी ‘या’ 6 दिग्गजांनी दिलेय प्रशिक्षण
ब्रेकिंग! मुंबई इंडियन्सला मिळाले नवे प्रशिक्षक, जयवर्धनेंच्या जागी ‘या’ दिग्गजाची वर्णी
रॉयल लाईफ जगतो टेनिसचा सम्राट, फेडररपुढे धोनी-कोहलीची कमाई चिल्लर; आकडा तर ऐका