दिवसेंदिवस भारतात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. बीसीसीआयने आयपीएल २०२१ चे आयोजन बंद दाराआड केले आहे. तरीही आपल्या देशाची सीमा बंद होण्याच्या भितीने ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी परतण्याच्या घाईत आहेत. आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे ऍडम झम्पा, केन रिचर्डसन आणि राजस्थान रॉयल्सचा अँड्र्यू फ्लिंटॉप या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी उर्वरित हंगामातून माघार घेतली आहे. अशात मुंबई इंडियन्सचा फलंदाज ख्रिस लिन याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे खास मागणी केली आहे.
आयपीएल २०२१ चा हंगाम संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना मायदेशी परतण्यासाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती त्याने बोर्डाला केली आहे.
न्यूज कॉर्प मीडियाशी बोलताना लिन म्हणाला की, “क्रिकेट ऑस्ट्रेलिया दरवेळी आयपीएल करारापैकी १० टक्के रक्कम घेते. मग यातील काही पैसे यंदा हंगाम संपल्यानंतर खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाच्या व्यवस्थेवर खर्च केले जाऊ शकत नाहीत का? मला जाणीव आहे की, लोक आमच्यापेक्षाही वाईट स्थितीत आहेत. परंतु आम्ही इथे कडक जैव सुरक्षित वातावरणात आहोत. याबरोबरच पुढील आठवड्यात आम्हाला कोरोनाची लसही देण्यात येणार आहे. त्यामुळे मी ऑस्ट्रेलियन सरकारकडून अपेक्षा करतो की ते आमच्यासाठी खास विमानाची व्यवस्था करतील.”
“याचा अर्थ असा होत नाही की, आम्ही शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सर्व जोखिमांचा विचार करुन पूर्ण हंगाम खेळण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आयपीएल २०२१ संपताच त्वरित घरी पोहोचणे चांगले असेल,” असे त्याने पुढे म्हटले.
भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहता ऑस्ट्रेलियासह ब्रिटेन, न्यूझीलंड असे बरेच देश भारतातून येणाऱ्या प्रवाशांसाठी सीमारेषा बंद करण्याच्या विचारात आहेत. याच कारणामुळे आयपीएलमध्ये सहभागी असलेले ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, प्रशिक्षक, समालोचक आणि इतर सदस्य हंगामाच्या अर्ध्यातून मायभूमी परतण्याच्या शक्यता आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी का करण्यात आला दिनेश कार्तिकचा सन्मान? ‘हे’ आहे कारण
सनराझर्समागचं दृष्टचक्र संपेना, संघ पिछाडीवर असताना कर्णधार उर्रवित हंगामातून घेणार माघार?
मन जिंकलस भावा! सामना झाल्यानंतर केकेआरच्या कर्णधाराचे हृद्यास भिडणारे भाष्य, एकदा वाचाच