इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगाम संपला. अंतिम सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने पदार्पणातच विजेतेपद जिंकले आहे. या हंगामात अनेक खेळाडूंना संधी मिळाली नाही, असे दिसून आले. त्यातील अर्जून तेंडूलकर हे एक नाव आहे.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघामध्ये २ वर्षांपासून उपस्थित असूनसुद्धा अर्जूनला अंतिम अकरा जणांच्या संघात स्थान मिळाले नाही. तर तो पंधराव्या हंगामात संघाकडून खेळणार असल्याचे वर्तवले जात होते, पण असे काही झाले नाही. त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळाली नाही यावर चाहते चांगलेच नाराज झाले. अशात आता त्याला संधी न मिळाल्याचे कारण मुंबई संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉण्ड यांनी स्पष्ट केले आहे.
“अर्जूनला अजून सराव करण्याची गरज आहे. तुम्ही मुंबई सारख्या संघाकडून खेळता तेव्हा संघात निवड होणे आणि अंतिम अकरामध्ये स्थान मिळवणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत”, असे बॉण्ड यांनी म्हटले आहे.
“आपण एका अशा टप्प्यात आलेलो असतो, तिथे तुम्हाला अंतिम अकरामध्ये सगळ्यांनाच संधी देता येत नाही. तर ती जागा तुम्हाला स्वत: मिळवावी लागते. अर्जूनलाही त्याच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर थोडी मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. त्याला पुढे स्थान मिळेल याची आशा आहे”, असेही बॉण्ड पुढे म्हणाले आहेत.
सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जूनला २०२२च्या लिलावात मुंबईने ३० लाख रूपयांमध्ये संघात विकत घेतले होते. त्यापूर्वी २०१९मध्ये मुंबईने त्याला २० लाखांत संघामध्ये घेतले होते.
पंधरावा आयपीएल हंगाम मुंबईसाठी निराशाजनक राहिला. १४ पैकी ४ सामने जिंकत ते गुणतालिकेत तळाला राहिले. यामध्ये त्यांनी टीम डेविड, रमनदिप सिंह, संजय यादव, कुमार कार्तिकेय, डेवाल्ड ब्रेविस आणि ट्रीस्टन स्टब्स यांना संधी दिल्या. तर वेगवान गोलंदाज अर्जूनला संघात घ्यायच्या त्यांच्या फक्त चर्चाच होत राहिल्या. “संघात संधी मिळेल की नाही याचा विचार न करता आपल्या कामगिरीवर लक्ष दे”, असे खुद्द सचिनने त्याला म्हटले आहे. बावीस वर्षीय अर्जूनने मुंबई टी२० लीगमध्ये दाखल होत फक्त दोन स्थानिक सामने खेळले आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वय वाढलं, पण धार गेली नाही! जेम्स अंडरसनने न्यूझीलंडच्या ४ विकेट्स घेत नावावर केला भीमपराक्रम
कौतुक करावे तितके कमीच! बेन स्टोक्स ‘थोर्प’ नावाची जर्सी घालून उतरला मैदानात, कारण अभिमानास्पद
एक रॅकेट हातात घेऊन जाणे ते प्रत्येक पाँईटनंतर घाम पुसणे, राफेल नदालबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी