आयपीएल 2024 मधून मुंबई इंडियन्सचा संघ बाहेर पडला आहे. मुंबईनं या हंगामात 14 पैकी केवळ 4 सामने जिंकले. मुंबईनं हंगामाच्या सुरुवातीला रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार केलं होतं. परंतु हार्दिक मुंबईसाठी काही खास कामगिरी करु शकला नाही. मुंबईला या स्थितीत पाहून संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मानं देखील नाराजी व्यक्त केली आहे. रोहितच्या भविष्याबाबत आता खूप चर्चा होऊ लागल्या आहेत. मुंबईनं रोहितला विश्वासात न घेता कर्णधार पदावरुन काढून टाकल्यानं मुंबईचे फॅन्स देखील टीम मॅनेजमेंटवर नाराज आहेत.
रोहित शर्मा पुढच्या हंगामात मुंबई इंडियन्सची साथ सोडणार का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. यावर मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी मोठं वक्तव्य केलं. बाउचर म्हणाले, “खरं सांगायच झालं तर यावर खूप चर्चा होत आहे. मी त्याच्याशी (रोहितशी) या संदर्भात बोललोय. मी त्याला विचारलं की, तुझं पुढचं नियोजन काय? यावर तो मला बोलला टी20 विश्वचषक! माझ्या मते रोहित त्याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. पुढच्या वर्षी मेगा लिलाव होणार आहे. कोणालाच माहित नाही की पुढच्या वर्षी काय होईल.”
मार्क बाउचर पुढे बोलताना म्हणाले की, “रोहित शर्मासाठी हा हंगाम खूपच चांगला राहिला. त्यानं हंगामाची सुरुवात चांगली केली होती. तो नेट्समध्ये चांगली फलंदाजी करत होता. तसेच त्यानं चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात शतक सुद्धा झळकावलं होतं.” आयपीएलच्या या हंगामात रोहित शर्मानं 14 सामन्यांमध्ये 32.08 च्या सरासरीनं 417 धावा ठोकल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 150 एवढा राहिला.
रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सचं 158 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. यापैकी मुंबईनं 87 सामने जिंकले आहेत. तर 67 सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्कारावा लागला. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या 5 आयपीएल हंगामांमध्ये विजेतेपद पटकावलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिनच्या पोरानं दाखवली ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाला खुन्नस, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
2 चेंडूत 2 षटकार खाल्यानंतर ओव्हर पूर्ण न करताच मैदानाबाहेर गेला अर्जुन तेंडुलकर! समोर आलं मोठं कारण