मागील जवळपास दोन वर्षांपासून सातत्याने पुढे ढकलल्या जात असलेल्या अमेरिकेतील टी20 लीगला अखेर मुहूर्त सापडला आहे. मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) नावाची ही स्पर्धा 13 जुलै ते 30 जुलै या कालावधीत खेळली जाईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सहापैकी चार संघांच्या संघमालकांची घोषणा करण्यात आली असून, हे चार संघ आयपीएल फ्रॅंचाईजींनी काही स्थानिक गुंतवणूकदारांसह विकत घेतले आहेत.
स्पर्धेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या संघांची घोषणा करण्यात आली. आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रॅंचाईजी असलेले मुंबई इंडियन्सने न्यूयॉर्क संघ आपल्याला आहे. तर चार वेळा आयपीएल जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्सने स्थानिक गुंतवणूकदारांसह टेक्सास फ्रॅंचाईजी आपल्या नावे केली. दिल्ली कॅपिटल्स मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्यासह सिएटल संघाचे मालक असतील. कोलकाता नाईट रायडर्सने स्पर्धेची घोषणा झाली त्यावेळीच लॉस एंजलिस फ्रॅंचाईजी आपल्या नावे केली होती. आता वॉशिंग्टन डीसी व सॅन फ्रान्सिस्को या अन्य संघांच्या मालकांची घोषणा होणे अद्याप बाकी आहे.
मेजर लीग क्रिकेटचा उद्घाटनाचा सामना टेक्सास येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रँड प्रेयरी स्टेडियम येथे होईल. 18 दिवस चालणारी ही स्पर्धा 6 संघांमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने खेळली जाईल. स्पर्धेवेळी अंतिम अकरांमध्ये सहा अमेरिकन खेळाडूंना स्थान दिले जाऊ शकते.
सध्या अमेरिकेत हळूहळू क्रिकेट प्रसिद्ध होत आहे. भारतीय उपखंडातील लोकांची लक्षणीय संख्या लक्षात घेता, आयसीसी देखील अमेरिकेत क्रिकेटचा प्रचार करण्यावर भर देतेय. त्याचाच एक भाग म्हणून 2024 च्या टी20 विश्वचषकाचे सह आयोजक म्हणून अमेरिकेला संधी दिली गेली आहे. सध्या अमेरिकेचा क्रिकेट संघ सदस्य असून, त्या विश्वचषकात यजमान म्हणून त्यांना थेट पात्रता फेरीत उतरण्याची संधी मिळेल.
(Mumbai Indians CSK KKR DC Own Teams In Major League Cricket In USA)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: पहिला वनडे सामना सोडून मेव्हण्याच्या लग्नात रोहितने लावले ठुमके, पत्नी रितिकानेही दिली साथ
‘मी सुरेश रैना आहे, शाहिद आफ्रिदी नाही’, रैनाने का उडवली पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची खिल्ली?