---Advertisement---

WPL 2025: मुंबई इंडियन्सची फायनलमध्ये धडक…! एलिमिनेटर सामन्यात गुजरातला चारली धूळ

---Advertisement---

यंदाच्या महिला प्रीमियर लीगमधील (Women Premier League 2025) एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स आमने-सामने होते. यादरम्यान हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने गुजरातला 47 धावांनी धूळ चारत फायनलमध्ये धडक मारली. (Mumbai Indians Into The Final)

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 213 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघ फक्त 166 धावा करू शकला. त्यामुळे मुंबईने 47 धावांनी शानदार विजय मिळवला. मुंबईने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही बाजूंनी दमदार कामगिरी केली आणि गुजरातचा धुव्वा उडवला.

गुजरातने टाॅस जिंकून प्रथम मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यास्तिका भाटिया स्वस्तात बाद झाली, पण हेली मॅथ्यूज आणि नॅट सायव्हर ब्रंट यांनी दमदार फलंदाजी केली. मॅथ्यूज आणि ब्रंट दोघींनीही 77 धावा केल्या आणि मिळून 133 धावांची मोठी भागीदारी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर देखील वेगळ्याच फाॅर्ममध्ये दिसली. तीने 12 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 36 धावांची शानदार खेळी केली.


महिला प्रीमियर लीगच्या (WPL) इतिहासात मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये प्रवेश करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, संघाने डब्ल्यूपीएल 2023चा फायनल सामना खेळला आणि दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडी राखून पराभव करून विजेतेपद जिंकले. आता (15 मार्च) रोजी फायनल सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---