मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे मुख्य प्रशिक्षक (head coach) महेला जयवर्धने (Mahela Jaywardhne ) यांचं म्हणणं आहे की, त्यांच्या मुख्य खेळाडूंनी वर्षांपासून जी विजयाची संस्कृती बनवली आहे त्यामुळे त्यांना दबावाच्या परिस्थितीत चांगलं प्रदर्शन करण्याची प्रेरणा मिळते. 5 वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघाने शुक्रवार (30 मे) आयपीएल एलिमिनेटर सामन्यात गुजरातचा पराभव करून दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. जिथे त्यांचा सामना रविवारी पंजाब विरुद्ध होणार आहे.
जयवर्धनने यांनी मोठ्या सामन्यांमध्ये संघाच्या चांगल्या प्रदर्शनाबद्दल म्हटले, विजयाची संस्कृती बनवून ठेवण्यासाठी अनुभवी खेळाडूंना मदत मिळते. त्यांनी सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले, जेव्हा तुमच्याकडे जिंकण्याची संस्कृती असते तेव्हा त्या गोष्टीला पुढे तसेच इथून ठेवण्याची ठेवण्यासाठी प्रयत्न करणे सोपे असते जिल्हा तुमच्याकडे मी नवा संघ असतो तेव्हाही तुमच्याकडे असेल काही खेळाडू असतात ज्यांच्याकडे खूप अनुभव असतो.
जयवर्धने यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav), हार्दिक पांड्या (hardik pandya) आणि जसप्रीत बुमराह (jaspreet bumrah) सहित संघाच्या मुख्य खेळाडूंचा उल्लेख करत म्हटले, आमचे बोलणे , आमच्या रणनीती सर्वकाही याबद्दल आहे की, आम्ही कशाप्रकारे चांगलं खेळू शकतो आणि आम्ही पुढे कसे जाऊ शकतो. हे खेळाडू वर्षांपासून संघाच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका करत आले आहेत.
ते म्हणाले, अनुभवी खेळाडूंना विजयाबद्दल सर्व काही त्यांना माहिती असते आणि संघात सामील होणाऱ्या युवा खेळाडूंना देखील ते हीच गोष्ट त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात. जिंकण्याची मानसिकता अनुभवी खेळाडू आणि चॅम्पियन संघाचा भाग ठरलेल्या खेळाडूंकडून येते, यामुळे त्यांना मदत मिळते.
.






