---Advertisement---

‘मुंबई इंडियन्सची बॅटिंग चालू आहे, मुद्द्याचचं बोला,’ मुख्यमंत्र्यांचे लाईव्ह चालू असताना चाहत्याची विनोदी प्रतिक्रिया

On: बुधवार, एप्रिल 14, 2021 12:42 PM
---Advertisement---

भारताला क्रिकेटवेड्यांचा देश असे म्हटले जाते, त्याचा प्रत्यय देखील अनेक घटनांमधून येत असतो. भारतात क्रिकेट माहित नसणारा व्यक्ती अपवादानेच सापडेल. अनेकदा चाहते आपला आवडता क्रिकेटपटू किंवा संघाबद्दल असलेले प्रेम विविधप्रकारे व्यक्त करत असतात. कधीकधी आपल्या आवडत्या संघासाठी चाहत्यांनी अनपेक्षित गोष्टी केल्याचीही उदाहरणे आहेत. असाच एक गमतीशीर किस्सा मंगळवारी (१३ एप्रिल) घडला.

त्याचे झाले असे की, मंगळवारी चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२१ चा पाचवा सामना चालू होता. ७.३० वाजता सुरू झालेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल कोलकाता संघाच्या बाजूने लागला आणि त्यांनी गोलंदाजी निवडली. त्यामुळे मुंबईचे फलंदाज प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरले होते. त्यांचा डाव चालू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह आले होते.

महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. यादरम्यान महाराष्ट्रातील लॉकडाऊन कसा असेल, जनतेवर कोणती बंदने असतील, अशाच बऱ्याच मुद्द्यांसंदर्भात सविस्तर माहिती दिली.

मुख्यमंत्री ठाकरे लाईव्ह बोलत असताना मुंबई इंडियन्सच्या एका चाहत्याने अतिशय अनोखी प्रतिक्रिया दिली. ‘मुंबई इंडियन्सची फलंदाजी चालू आहे. थेट मुद्द्यावर या,’ अशी विनोदी प्रतिक्रिया त्या अज्ञात चाहत्याने दिली. त्या चाहत्याचे नाव कारिया हिरेन असे आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने त्या चाहत्याच्या गमतीशीर प्रतिक्रियेचा स्क्रिनशॉट इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सेहवागने शेअर केलेल्या या मजेशीर पोस्टवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Photo Courtesy: Instagram/@virendersehwag

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1381986236458360837?s=20

दरम्यान या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना कोलकाताला १५३ धावांचे आव्हान दिले होते. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने ४३ धावांचे योगदान दिले होते. तर सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ५६ धावा चोपल्या होत्या. कोलकाताचा गोलंदाज आंद्रे रसेल याने १५ धावांवर त्यांचे ५ फलंदाज बाद करत त्यांना १५३ धावांवर रोखले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला २० षटकांत ७ बाद  केवळ १४२ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून नितीश राणाने अर्धशतक केले होते. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांनी स्वस्तात विकेट्स गमावल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईकडून राहुल चाहरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तसेच ट्रेंट बोल्टने २ आणि कृणाल पंड्याने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-

चिवट लढतीनंतर कडवा शेवट, केकेआरच्या लाजिरवाण्या पराभवाची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे!

रोहितसारखा कर्णधार होणे नाही! त्याच्या ‘त्या’ शब्दांमुळे मला एवढी दमदार गोलंदाजी करता आली- राहुल चाहर

‘…म्हणूनच मुंबई इंडियन्सचे खेळाडू इतके प्रगतीशील आहेत,’ भारतीय दिग्गजाने केली रोहितची स्तुती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---