आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सला आगामी हंगामात वेगवान गोलंदाजांची उणीव भासणार आहे. मुंबईचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आगामी आयपीएल हंगामात खेळणार नाहीये. अशातच संघाला दुसरा मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन आयपीएल 2023च्या संपूर्ण हंगामातून माघार घेण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे रिचर्डसनला आगामी आयपीएल हंगामातून माघार घ्यावी लागणार, हे जवळपास पक्के मानले जात आहे.
मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ राहिला आहे. आतापर्यंत पाच आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या मुंबई इंडियन्सला यावर्षी सहाव्या आयपीएल ट्रॉफीची अपेक्षा आहे, पण दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये संघाचे हे स्पप्न अपूर्ण राहू शकते. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मोठ्या काळापासून क्रिकेटच्या मैदानात दिसला नाहीये. काही दिवसांपूर्वी बुमराह आगामी आयपीएल हंगामत खेळणार नसल्याची पुष्टी देखील फ्रँचायझीला मिळाली. सध्या न्यूझीलंडमध्ये बुमराह शस्त्रक्रियेसाठी गेला आहे आणि पुनरागमनासाठी त्याला अजून मोठा काळ लागू शकतो. ऑस्ट्रेलियन युवा गोलंदाज झाय रिचर्डसन (Jhye Richardson) बुमराच्या अनुपस्थितीत संघासाठी महत्वाची भूमिका पाडेल, अशी अपेक्षा मुंबईच्या संघ व्यवस्थापनाला होती. पण ताज्या माहितीनुसार रिचर्डसन संपूर्ण आयपीएल 2023 मध्ये खेळण्यासाठी फिट नसेल.
झाय रिचर्डसनची भावूक पोस्ट
झाय रिचर्डसनला 4 जानेवारी रोजी हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. तेव्हापासून रिचर्डसन क्रिकेटच्या मैदानातून बाहेर आहे. रिचर्डसनने शनिवारी (11 मार्च) आपल्या सोशल मीडिया खात्यावरून एक पोस्ट करत दुखापतीची माहिती दिली. या फोटोत ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज रुग्णालयात भरती असल्याचे दिसते. कॅप्शनमध्ये लिहिले गेले आहे की, “दुखापत क्रिकेटचा भाग आहे हे, सत्य आहे. मागचे काही वर्ष माझ्यासाठी कठीण राहिले आहेत. पण सध्या मी असा स्थितीत आहे, जिथून सर्वश्रेष्ठ बनण्यासाठी जेवढे परिश्रण घेता येतील, तेवडे घेऊ शकतो.”
Injuries are a big part of cricket, thats a fact. Frustrating? Absolutely.
But I’m now in a scenario where I can get back to doing what I love and work bloody hard to become an even better player than before.
One step back, two steps forward.
Let’s do this. pic.twitter.com/7FdFeV8adj— Jhye Richardson (@jhyericho) March 11, 2023
आयपीएल 2023 हंगाम 31 मार्च रोजी सुरू होणार असून रिचर्डसनला दुखापतीतून सावरण्यासाठी अजून काही महिने लागू सकतात. अशात आगामी आयपीएल हंगामात तो खेणार नाही, हे जवळपास नश्चित झाले आहे. दरम्यान, दुखापतीच्या कारणास्तव रिचर्डसनने मार्श कप आणि शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतूनही माघार घेतली होती. सध्या ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांमधील कसोटी मालिका संपल्यानंतर 17 मार्च रोजी तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होईल. वनडे मालिकेसाठी रिचर्डसनला ऑस्ट्रेलियन संघात निवडले गेले होते, पण दुखापतीमुळे त्याला या मालिकेत खेळण्याची संधीही मिळाली नाही. रिचर्डसनच्या जागी नाथन लायनला वनडे संघात सामील केले गेले. दरम्यान, बुमराह आणि रिचर्डसन हे दोन वेगवान गोलंदाज आगामी आयपीएल खेळले नाही, तरी मुंबईचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आगमी आयपीएल हंगामासाठी उपस्थित असणार आहे.
(Mumbai Indians fast bowler Jhye Richardson will not be able to play in IPL 2023 due to injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शुबमनच 2023चा बादशाह! जगातल्या कुठलाच खेळाडूला न जमलेली कामगिरी, गिलने तीनच महिन्यात केली; वाचाच
कौतुक तर केलंच पाहिजे! शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलं कारकीर्दीतलं दुसरं शतक