---Advertisement---

आयपीएल २०१९: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध असा आहे मुंबई इंडियन्सचा ११ जणांचा संघ

On: रविवार, मार्च 24, 2019 8:03 PM
---Advertisement---

मुंबई। आयपीएलच्या 12 व्या मोसमात आज(24 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

हा सामना आयपीएलमधील एकूण 700 वा सामना आहे. या सामन्यासाठी मुंबईच्या संघाकडून भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला संधी देण्यात आली आहे. तसेच मुंबई इंडियन्सकडून आज रसीक सलाम आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे.

त्याचबरोबर मुंबईने क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मॅक्लेनघन या परदेशी खेळाडूंना तर दिल्लीने कॉलिन इंग्राम, किमो पॉल, कागिसो रबाडा आणि ट्रेंट बोल्ट या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे.

असे आहेत 11 जणांचे संघ- 

मुंबई इंडियन्स – 

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, कृणाल पंड्या, युवराज सिंग, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, बेन कटिंग, मिशेल मॅकक्लेनघन, रसिक सलाम, जसप्रीत बुमराह.

दिल्ली कॅपिटल्स – 

शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिषभ पंत, कॉलिन इंग्राम, किमो पॉल, अक्षर पटेल, राहुल तवेतिया, कागीसो राबडा, ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलआधी सौरव गांगुलीचा युवराज सिंगला खास सल्ला, पहा व्हिडिओ

१ वर्षानंतर वॉर्नरचे शानदार पुनरागमन, पहिल्याच सामन्यात केले ३ मोठे पराक्रम

या संघाचे आयपीएलमध्ये झाले आहेत सर्वाधिक कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment