आयपीएल 2025 स्पर्धेतील आज म्हणजेच 31 मार्च रोजी 12 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला जात आहे. मुंबई इंडियन्स संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच केकेआर संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे.
मुंबई इंडियन्स संघाची हंगामात सुरुवात चांगली झालेली नाही. संघाने पहिला सामना चेन्नईविरुद्ध खेळला गेला होता ज्यामध्ये चेन्नईने मुंबईचा पराभव करत सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यात देखील मुंबईला गुजरातकडून पराभव पत्करावा लागला. केकेआर संघाबद्दल बोलायचे झाल्यास संघाने 1 सामना जिंकला आहे.
आज दोन्ही संघांमध्ये हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली तसेच केकेआर संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. मागच्या सामन्यात केकेआरचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन खेळला नव्हता. आज तो खेळताना दिसेल का हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन
मुंबई:-हार्दिक पांड्या (कर्णधार) रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर मिचेल सेंटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, विघ्नेश पुथुर.
केकेआर-अजिंक्य रहाणे,क्विंटन डीकॉक, सुनील नरेन व्यंकटेश अय्यर, अंगक्रुश रघुवंशी,रिंकू सिंग, आंध्रे रसेल, रमनदीप सिंग, स्पेन्सर जॉनसन, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती