मुंबई। आज(10 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात सामना होणार आहे. या सामन्याआधी मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा नियमित कर्णधार रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे.
त्याला मंगळवारी मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रावेळी ही दुखापत झाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याला त्याला मुकावे लागले आहे. त्याच्याऐवजी किरॉन पोलार्ड हा आज मुंबई इंडियन्सचे प्रभारी कर्णधारपद सांभाळणार आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून मुंबईकडून आज युवा खेळाडू सिद्धेश लाड पदार्पण करत आहे. त्याला रोहित शर्माने कॅप दिली आहे. तसेच त्याला रोहित शर्माऐवजी संघात संधी देण्यात आली आहे.
रोहितच्या दुखापतीबद्दल नाणेफेकीवेळी पोलार्ड म्हणाला, ‘रोहित ठिक आहे. पण सावधगिरी बाळगण्यासाठी आम्ही त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.’
तसेच पंजाब संघात दोन बदल करण्यात आले आहेत. मयंक बोटाच्या दुखापतीतून सावरला नसल्याने त्याच्याऐवजी करुण नायरला संधी देण्यात आली आहे. तसेच हार्डस विलजोनला मुजीब उर रेहमान ऐवजी संधी मिळाली आहे.
Siddhesh Lad is all set to make his debut for the @mipaltan ????????#MIvKXIP pic.twitter.com/tPw5eQN3sv
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2019
असे आहेत 11 जणांचे संघ –
मुंबई इंडियन्स – सिद्धेश लाड, क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), सूर्यकुमार यादव, इशान किशन, कृणाल पंड्या, किरॉन पोलार्ड (कर्णधार), हार्दिक पंड्या, राहुल चहर, अल्झारी जोसेफ, जेसन बेऱ्हेन्डॉर्फ, जसप्रीत बुमराह.
किंग्स इलेव्हन पंजाब – केएल राहुल, ख्रिस गेल, करुण नायर, सर्फराज खान, डेव्हिड मिलर, मनदीप सिंग, आर अश्विन (कर्णधार), सॅम करन, हार्डस विलजोन, मोहम्मद शमी, अंकित राजपूत






