इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील २३वा सामना बुधवारी (१३ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर पार पडणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी ७ वाजता नाणेफेक झाली असून मुंबई संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. मुंबई संघ पंजाबविरुद्ध विजय मिळवत हंगामातील पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.
मुंबई इंडियन्स संघ एका बदलासह मैदानावर उतरणार आहे. रमणदीप सिंगच्या जागी टायमल मिल्सला एन्ट्री मिळाली आहे. तसेच, दुसरीकडे पंजाब संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाहीये.
Captain Rohit Sharma wins the toss and #MumbaiIndians will bowl first against #PBKS.
Live – https://t.co/QpRklNl6wU #MIvPBKS #TATAIPL pic.twitter.com/mtE46j57TP
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
यंदाच्या हंगामातील कामगिरी
मुंबई संघाने आतापर्यंत या हंगामात ४ सामने खेळले आहेत. या चारही सामन्यात मुंबईला सपाटून पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई संघ गुणतालिकेत तळाशी आहे. दुसरीकडे, पंजाब संघाने आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यात २ वेळा पराभव, तर २ वेळा विजयाचं पाणी चाखलं आहे. ते गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहेत.
A look at the Playing XI for #MIvPBKS
Live – https://t.co/emgSkWA94g #MIvPBKS #TATAIPL https://t.co/tayy1NGp3R pic.twitter.com/ltWzJETUiH
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आमने- सामने कामगिरी
मुंबई आणि पंजाब संघात आतापर्यंत २८ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये मुंबईने पंजाबविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवले आहे. मुंबईने सर्वाधिक १५ सामने जिंकले आहेत, तर पंजाबने मुंबईविरुद्ध उर्वरित १३ सामने खिशात घातले आहेत.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बेसिल थंपी.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन- मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा आणि अर्शदीप सिंग.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बेंगलोरने सामना गमावला, पण विराटने जिंकली सर्वांची मने; संघर्ष करणाऱ्या ऋतुराजला केले प्रेरित
IPL2022| मुंबई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
IPL 2022| चेन्नईने ‘या’ विक्रमात अव्वलस्थानी असलेल्या बेंगलोरला गाठलेच! मुंबई-पंजाब अद्याप खूप दूर