---Advertisement---

मुंबईचा राजा एकच! मुंबई इंडियन्सचे किंग्स इलेव्हन पंजाबला सोशल मीडियावर प्रतिउत्तर…

On: गुरूवार, एप्रिल 11, 2019 6:37 PM
---Advertisement---

मुंबई। बुधवारी(10 एप्रिल) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात रोमांचकारी सामना पहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने 3 विकेट्सने विजय मिळवत या मोसमातील चौथा विजय मिळवला.

मुंबईकडून प्रभारी कर्णधार किरॉन पोलार्डने 31 चेंडूत 10 षटकार आणि 3 चौकार मारत 83 धावांची तुफानी खेळी खेळेली. त्यामुळे मुंबईला पंजाबने दिलेले 198 धावांचे आव्हान पार करणे शक्य झाले.

या सामन्यात पंजाबकडून केएल राहुलने आयपीएलमधील पहिली शतकी खेळी करताना 64 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. त्यामुळे पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 197 धावा केल्या.

राहुलच्या या शतकानंतर पंजाबच्या ट्विटर अकांउंटवरुन राहुलचा फोटो असलेली एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टला ‘आयपीएलमधील केएल राहुलचे पहिले शतक,’ असे कॅप्शन देताना पुढे लिहीले होते की ‘मुंबई का किंग कौन?’

यावर पोलार्डने तुफानी खेळी केल्यानंतर मुंबई इंडियन्सने लगेचच प्रतिउत्तर दिले. त्यांनी पोलार्डचे तोंडावर बोट ठेवलेले कॅरिकेचर पोस्ट करत त्याला कॅप्शन दिले की ‘मुंबईचा राजा, एकच’

पोलार्डने या सामन्यात मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे अनुपस्थितीत असल्याने मुंबई इंडियन्सचे प्रभारी कर्णधारपद सांभाळले.

पोलार्ड या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजयासाठी 4 चेंडूत 4 धावा हव्या असताना आणि 4 विकेट बाकी असताना बाद झाला. पण अखेर मुंबईच्या अल्झारी जोसेफने शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना त्या विजयी धावा करत मुंबईला विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या – 

एमएस धोनीला आयपीएलमध्ये सर्वात मोठा इतिहास घडवण्याची आज सुवर्णसंधी

एमएस धोनीची एअरपोर्टवर क्षणभर विश्रांती!

धोनीबरोबर टेबल टेनिस खेळण्याचा या खेळाडूला झाला फायदा!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment