आयपीएल 2023 ची रंगत आता वाढू लागली आहे. स्पर्धेतील काही मोजकेच सामने शिल्लक असताना, अजूनही 8 संघ 16 गुणांसह प्ले ऑफ शर्यतीत आहेत. त्याचवेळी आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी उंचावून सर्वांना चकित केले आहे. खराब सुरुवातीनंतर आता मुंबईने सातत्यपूर्ण कामगिरी करत पहिल्या तीनमधील आपले स्थान मजबूत केले.
मुंबई इंडियन्सने शुक्रवारी झालेल्या सामन्यात पहिल्या क्रमांकावरील गुजरातला पराभूत केले. मुंबईला आणखी मोठा विजय साजरा करून रनरेट वाढवण्याची संधी होती. यामध्ये त्यांना अपयश आले असले तरी दोन महत्त्वपूर्ण गुण त्यांच्या खात्यात सामील झाले आहेत. आता मुंबई 12 सामन्यांमध्ये सात विजय मिळवून तिसऱ्या क्रमांकावर काबीज आहे. सध्या त्यांच्यापुढे केवळ गुजरात व चेन्नई अनुक्रमे 16 व 15 गुणांसह आहेत.
मुंबईला आता स्पर्धेत आणखी दोन सामने खेळायचे आहेत. हे सामने अनुक्रमे लखनऊ व हैदराबादविरुद्ध होतील. या दोन्ही सामन्यात विजय मिळवल्यास मुंबईचे 18 होऊन त्यांच्याकडे पहिल्या दोन क्रमांकावर साखळी फेरी संपवण्याची संधी असेल. यातील एका सामन्यात विजय मिळवला आणि दुसरीकडे राजस्थानने दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर, राजस्थानची प्ले ऑफ्स खेळण्याची संधी सरस धावगतीच्या जोरावर वाढेल.
याबरोबरच मुंबईला प्रार्थना करावी लागेल की, लखनऊने आपल्या उर्वरित तीन पैकी दोन सामन्यात पराभव पत्करावा. या उभय संघांमध्ये सामना होणार असल्याने ती लढत अत्यंत महत्त्वाची होईल. दुसरीकडे चेन्नईने उर्वरित दोन पैकी एका सामन्यात पराभव स्वीकारला आणि मुंबईने दोन्ही सामन्यात विजय साजरा केला तर, ते दुसऱ्या स्थानी येऊ शकतात. अशा स्थितीत मुंबईला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील.
त्यामुळे विजय रथावर आरूढ असलेली मुंबई आता उर्वरित दोन्ही सामने जिंकून प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरण्याची शक्यता अधिक आहे.
(Mumbai Indians IPL 2023 Play Offs Equation They Targeting Top Two)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वक्त बदल दिया! फ्लॉप सुरुवातीनंतर सूर्याने दाखवला ‘सुपला फॉर्म’, पाहा जबरदस्त आकडेवारी
‘हे केवळ त्याच्यासाठी’, दमदार कमबॅक केलेला चावला घेतोय आपल्याच मुलाकडून प्रेरणा