हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 20 धावांनी पराभव पत्कारावा लागला. मुंबईचा या हंगामातील हा चौथा पराभव आहे. आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांमध्ये 4 पराभवानंतर मुंबई इंडियन्सची गुणतालिकेत आठव्या स्थानी घसरण झाली आहे. त्यांच्याकडे सध्या 4 अंक आहेत. आता मुंबईच्या फॅन्सला प्रश्न पडला असेल की, टीम अजूनही प्लेऑफसाठी पात्र ठरू शकते का? प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्ससाठी समीकरण काय? चला तर मग यावर एक नजर टाकूया.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशांना धक्का बसला आहे. मात्र हार्दिक पांड्याच्या संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे अजूनही परिस्थिती त्यांच्या हातात आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफमध्ये पोहोचणं सोपं नसलं तरी आशा मात्र नक्कीच जिवंत आहेत.
मुंबई इंडियन्सला या हंगामात आणखी 8 सामने खेळायचे आहेत. जर संघानं आपले सर्व सामने जिंकले तर त्यांचे एकूण 20 गुण होतील. अशाप्रकारे हार्दिक पांड्याचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल. मात्र जर मुंबई आपले सामने हरत गेली, तर ते जर-तर च्या स्थितीत अडकू शकतात. अशा स्थितीत त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.
मुंबई इंडियन्स त्यांचा पुढील सामना पंजाब किंग्जविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण पंजाबची स्थिती मुंबईपेक्षा काही वेगळी नाही. वास्तविक, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जचे समान गुण (4-4) आहेत. हा सामना जिंकून दोन्ही संघांना प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या आहेत. त्याच वेळी, या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघासाठी परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. याचाच अर्थ त्या संघाच्या प्लेऑफच्या आशा धुळीस मिळू शकतात. त्यामुळे पुढील सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी आपला पूर्ण जोर लावतील, यात शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
“हार्दिक पांड्याचं नेतृत्व अन् गोलंदाजी दोन्ही अगदी सामान्य”, सुनील गावसकरांची जोरदार टीका