---Advertisement---

लिलावानंतर मुंबई इंडियन्सची पलटण मजबूत! संघानं धोनीच्या विश्वासूलाच घेतलं ताफ्यात

On: मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024 4:35 PM
Mumbai-Indians
---Advertisement---

मुंबई इंडियन्सने दोन दिवसीय आयपीएल 2025 मेगा लिलावात परवडणारी खरेदी केली. मुंबई आपले 5 खेळाडू रिटेन करुन लिलावात 45 कोटी रुपयांसह उतरली होती. ज्यात त्यांनी 18 खेळाडूंना खरेदी केले. मुंबईच्या पर्समध्ये 20 लाख रुपये शिल्लक आहेत. मुंबईने लिलावात सर्वाधिक पैसा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टवर खर्च केला. बोल्टच्या खिश्यात 12.5 कोटी आले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. बोल्ट यापूर्वीही मुंबई संघाचा भाग होता. लिलावापूर्वी त्याला राजस्थान रॉयल्सने सोडले होते. एमआयकडे 23 खेळाडूंचा संघ आहे. ज्यात 8 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

बोल्टनंतर एमआयने वेगवान गोलंदाज दीपक चहरवर सर्वात मोठी बोली लावली. चाहरला 9.2 कोटी रुपये मिळाले. त्याला चेन्नई सुपर किंग्जने सोडले. मुंबईने विल जॅक आणि नमन धीर यांना 5.25 कोटी रुपये दिले. तसेच संघाने 30 लाख रुपयांना चार खेळाडू खरेदी केले. फ्रँचायझीने लिलावापूर्वी कर्णधार हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मासह पाच खेळाडूंना कायम ठेवले होते. गेल्या मोसमात पाचवेळा चॅम्पियन मुंबईने निराशाजनक कामगिरी केली होती. मागील हंगामात संघ पॉइंट टेबलमध्ये 10व्या स्थानावर राहिला. मुंबई पलटण 18व्या मोसमात धुमधडाक्यात पुनरागमन करण्याच्या विचारात आहे.

मुंबईने मेगा लिलावात विकत घेतले खेळाडू

ट्रेंट बोल्ट – 12.5 कोटी रुपये

दीपक चहर- 9.25 कोटी रुपये

नमन धीर – 5.25 कोटी रुपये

विल जॅक-  5.25 कोटी रुपये

अल्लाह गझनफर – 4.8 कोटी रुपये

रायन रिकेल्टन – 1 कोटी रुपये

रॉबिन मिन्झ – 65 लाख रुपये

करण शर्मा – 50 लाख रुपये

मिचेल सँटनर – 2 कोटी रुपये

लिझार्ड विल्यम्स- 75 लाख रुपये

सृजित कृष्णन- 30 लाख रुपये

राज अंगद बावा – 30 लाख रुपये

सत्यनारायण राजू – 30 लाख रुपये

अश्वनी कुमार – 30 लाख रुपये

अर्जुन तेंडुलकर – 30 लाख रुपये

विघ्नेश पुथर – 30 लाख रुपये

बेव्हॉन जेकब्स – 30 लाख रुपये

आयपीएल 2025 साठी मुंबईचा संघ 

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, टिळक वर्मा, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक, अश्विनी कुमार, मिशेल सँटनर, कृष्ण टोपली, रीस टोपली. सृजित, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, लिझाद विल्यम्स, विघ्नेश पुथूर

हेही वाचा-

IPL 2025 : मुंबई, चेन्नईमध्ये कोणते नवीन खेळाडू आले? सर्व संघांची संपूर्ण यादी येथे जाणून घ्या
IPL; यंदाच्या मेगा लिलावात सर्वात बलाढ्य संघ कोणी बनवला? पाहा तज्ञांचे मत!
आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंची यादी, टाॅप-10 मध्ये भारतीयांचा दबदबा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---