इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये खराब प्रदर्शन करणारा मुंबई इंडियन्स संघ ८ सामन्यांनंतर गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे. भलेही या संघाचे चालू हंगामातील प्रदर्शन खराब राहिले असले तरीही, त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूवर मात्र याचा कसलाही फरक पडलेला नाही. बिजनेस मॅगझिन फोर्ब्सनुसार (Business Magazine Forbes), आताही मुंबई संघ आयपीएलमधील सर्वात मौल्यवान संघ आहे. ४ वेळची आयपीएल विजेती चेन्नई सुपर किंग्ज आणि २ वेळची विजेती कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझी याबाबतीत मुंबईच्या मागे आहेत.
मुकेश अंबानीची (Mukesh Ambani) मालकी असलेल्या मुंबई संघाची (Mumbai Indians) किंमत सध्या १.३ मिलियन डॉलर अर्थात जवळपास १० हजार कोटी इतकी आहे. अशाप्रकारे मुंबई संघ सर्वात मौल्यवान संघांच्या यादीत (IPL Most Valuable Teams) अव्वलस्थानी आहे. त्यानंतर माजी बीसीसीआय अध्यक्ष आणि बिजनेसमन एन श्रीनिवासन यांचा चेन्नई संघ याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई संघाची किंमत ८८०६ कोटी रुपये आहे. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची मालकी असलेला कोलकाता संघ तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची किंमत ८४२४ इतकी आहे.
तसेच आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेला लखनऊ सुपरजायंट्स ८२३३ कोटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांच्यानंतर रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ पाचव्या क्रमांकावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाज, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स या संघांचा नंबर लागतो.
आयपीएल २०२२चे सर्वात मौल्यवान संघ-
मुंबई इंडियन्स- ९९५६ कोटी
चेन्नई सुपर किंग्ज- ८८०६ कोटी
कोलकाता नाइट रायडर्स- ८४२४ कोटी
लखनऊ सुपरजायंट्स- ८२३३ कोटी
दिल्ली कॅपिटल्स- ७९२६ कोटी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- ७८५० कोटी
राजस्थान रॉयल्स- ७६५८ कोटी
सनराइजर्स हैदराबाद- ७४२८ कोटी
पंजाब किंग्ज- ७०८४
गुजरात टायटन्स- ६५१० कोटी
मुंबई इंडियन्सला मिळत नाहीय अपेक्षित यश
दरम्यान आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हटला जाणारा मुंबई संघ आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सपशेल फ्लॉप ठरत आहे. त्यांना आतापर्यंत हंगामातील एकही सामना जिंकला आलेला नाही. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या ८ पैकी आठही सामने गमावले आहेत. या निराशाजनक प्रदर्शनासह मुंबई संघ प्लेऑफच्या शर्यतीत बाहेर पडला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘तीन-चार फ्रँचायझी खोटे बोलल्या, त्यांनी धोका दिला’, हर्षल पटेलचा मोठा खुलासा
रियान परागचा फलंदाजीतच नाही, तर फिल्डिंगमध्येही जलवा; कॅलिस, गिलख्रिस्टच्या पंक्तीत स्थान
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा बाद होणारा बेंगलोर दुसरा संघ, पहिल्या क्रमांकावर ‘या’ संघाचे नाव