मुंबई। मुंबई इंडियन्स आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा आजचा दिवसही गोलंदाजांनी गाजवला. अथर्व भगत आणि अर्णव वानखेडे यांनी आपापल्या संघांसाठी प्रत्येकी ६ विकेट्स घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला. यात उजवी ठरली ती मानव चौहान आणि आकाश पवार यांनी आपापल्या संघांसाठी केलेली अष्टपैलू कामगिरी. या दोघांनी फलंदाजीत अर्धशतकी खेळी करताना गोलंदाजीतही कमाल केली.
१६ वर्षांखालील मुलांच्या गटात दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर संघाने अथर्व भगतच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर मोठा विजय मिळवला. पृथ्वी नायरची ११३ धावांची फटकेबाजी आणि गौरव विश्वकर्माच्या ४६ धावांच्या जोरावर शारदाश्रम संघाने ३५ षटकांत ६ बाद ४०६ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात अथर्वने आपल्या भेदक माऱ्याने विश्वज्योत हायस्कूल संघाचा डाव २३ षटकांत ६९ धावांवर गुंडाळला आणि संघाला ३३७ धावांनी विजय मिळवून दिला. अथर्वने सहा विकेट्स घेतल्या.
याच गटात श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलच्या अर्णव वानखेडेने सहा विकेट्स घेत प्रतिस्पर्धी व्हिक्टोरिया हायस्कूलचा डाव १३.४ षटकांत ८६ धावांवर गुंडाळला. श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ( ठाणे) संघाने हे लक्ष्य १६.२ षटकांत ५ बाद ९४ धावा करून पार केले.
गोलंदाजांचे वर्चस्व असलेल्या आजच्या दिवसात मानव चौहान आणि आकाश पवार यांच्या अष्टपैलू खेळीनेही सर्वांचे लक्ष वेधले. वसईच्या सेंट ॲने कॉन्व्हेंट स्कूल संघाने २२८ धावा राखून वडाळाच्या एनकेईएस संघावर विजय मिळवला. मानव चौहानने ५० चेंडूंत नाबाद ५१ धावा करताना कॉन्व्हेंट संघाला ३८ षटकांत ७ बाद २५९ धावा करून दिल्या. त्यानंतर गोलंदाजीत ४ विकेट्स घेत मानवने एनकेईएस संघाला १२ षटकांत ९ बाद ३१ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले.
आकाश पवारनेही २९ चेंडूंत ५० धावांची खेळी आणि तीन विकेट्स अशा अष्टपैलू खेळीच्या जोरावर आयईएस नवी मुंबई हायस्कूल ( वाशी) संघाला विजय मिळवून दिला.
१४ वर्षांखालील गटात दादरच्या डॉ. ॲन्टोनियो डीसिल्व्हा संघाने आयईएस राजा शिवाजी विद्यालय ( दादर) संघावर ३०० धावांनी विजय मिळवला. प्रणय राणा १०२ चेंडूंत नाबाद १३७ धावा चोपून संघाला ३६ षटकांत ३ बाद ४१९ धावांचा डोंगर उभा करून दिला. त्याला प्रणव गुप्ताने ७५ धावा करून चांगली साथ दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना आयईएस राजा शिवाजी विद्यालय ( दादर) संघाला ३१.४ षटकांत सर्वबाद ११९ धावा करता आल्या.
संक्षिप्त धावफलक –
१६ वर्षांखालील मुले –
शारदाश्रम विद्यामंदिर ( दादर) ३५ षटकांत ६ बाद ४०६ ( पृथ्वी नायर ११३, गौरव विश्वकर्मा ४६) वि. वि. विश्वज्योत हायस्कूल २३ षटकांत सर्वबाद ६९; सामनावीर – अथर्व भगत (६ विकेट्स)
अंजुमन ए इस्लाम इंग्लिश स्कूल ( वाशी) १२.३ षटकांत २ बाद ८५ ( फरहान शेख ५७*, इरफान मणिहार १५*) वि. वि. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ३० षटकांत सर्वबाद ८१; सामनावीर – अझीम शेख ( ५ विकेट्स आणि दोन निर्धाव षटके)
स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ( बोरीवली) 15.2 षटकांत बिनबाद १२२ ( मल्हार माने ७२*, इशान रॉय ४३*) वि. वि. होली क्रॉस हायस्कूल ( लोवर परेल)३६.४ षटकांत सर्वबाद १२१; सामनावीर – मल्हार माने ( ४७ चेंडूंत नाबाद ७२ धावा)
श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ( ठाणे) १६.२ षटकांत ५ बाद ९४ ( राज जैन २८, गौरेश बाघमारे २२) वि. वि. व्हिक्टोरिया हायस्कूल १३.४ षटकांत सर्वबाद ८६; सामनावीर – अर्णव वानखेडे ( ६ विकेट्स)
आरएन पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई ९.४ षटकांत १ बाद ३७ ( वंश बजाज १४*, अदित बहुतुले १०*) वि. वि. बालमोहन विद्यामंदिर इंग्लिश मीडियम ( दादर) १६.२ षटकांत ८ बाद ३६; सामनावीर – नेस मालेसरा ( ५ विकेट्स आणि ३ निर्धाव षटके)
सेंट ॲने कॉन्व्हेंट स्कूल ( वसई) ३८ षटकांत ७ बाद २५९ ( मानव चौहान ५१*, यश पुरोहित ३१*) वि. वि. एनकेईएस ( वडाळा) १२ षटकांत ९ बाद ३१; सामनावीर – मानव चौहान ( ५० चेंडूंत नाबाद ५१ धावा आणि ४ विकेट्स)
आयईएस नवी मुंबई हायस्कूल ( वाशी) ३८ षटकांत ५ बाद ३१० ( आकाश पवार ५०, नूर सय्यद ४८*) वि. वि. ट्री हाऊस हायस्कूल ( विरार) २३ षटकांत सर्वबाद ५८; सामनावीर – आकाश पवार ( २९ चेंडूंत ५० धावा आणि ३ विकेट्स)
अव्हर लेडी ऑफ पर्पेच्युअल हायस्कूल २१.२ षटकांत ४ बाद ११९ ( राहुल मुथूकृष्णम ३५, आर्यन आगळे ३०*) वि. वि. सेंट ॲलोयसिस हायस्कूल ३२.५ षटकांत सर्वबाद ११८; सामनावीर – राहुल मुथुकृष्णन ३५ धावा आणि १ विकेट्स)
१४ वर्षांखालील मुले –
आयई एस न्यू इंग्लिश स्कूल ( वांद्रे ) २५.२ षटकांत १ बाद ११० ( आरुष पाटणकर ३८*, अर्जुन बागायतकर २७) वि. वि. नॅशनल इंग्लिश हायस्कूल ( विरार) ३८ षटकांत सर्वबाद १०५; सामनावीर – कृष्णा पारीख ( ७-२-१४-३)
सेंत स्टॅनिस्लास हायस्कूल ( वांद्रे) १४ षटकांत १ बाद ९१ ( अर्जुन जैस्वाल ४२*, मलय रेडकर १८*) वि. वि. एसआयईएस हायस्कूल २४.५ षटकांत सर्वबाद ९०; सामनावीर – फरहान खान ( ४ विकेट्स)
शिशुवन स्कूल ( माटुंगा) ९.१ षटकांत ३ बाद ६३ ( रिषभ कराणी २६*, अनमोल बोहरा ९*) वि. वि. विब्ग्योर हायस्कूल ( खारघर) १३.१ षटकांत सर्वबाद ५९; सामनावीर – रिषभ कराणी ( १३ चेंडूंत २६* धावा आणि १ विकेट)
सीएनएमएस ( विलेपार्ले) १७.३ षटकांत २ बाद १०६ ( देवांश शाह ४४, हृदय मेहता २६*) वि. वि. सेंट झेव्हियर हायस्कूल ( एरोली) २४.५ षटकांत सर्वबाद १०४; सामनावीर- हृदय मेहता ( ३ विकेट्स आणि १ निर्धाव)
स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ( बोरीवली) २५.४ षटकांत ३ बाद १३२ ( रुद्र टंक ५३*, आदेश राणे ४३*) वि. वि. व्हीपीएमएस विद्यामंदिर ( दहिसर) ३५ षटकांत ५ बाद १३१; सामनावीर – रुद्र टंक ( ७२ चेंडूंत नाबाद ५३ धावा आणि एक विकेट)
डॉ. ॲन्टोनियो डीसिल्व्हा ( दादर) ३६ षटकांत ३ बाद ४१९ ( प्रणय राणा १३७*, प्रणव गुप्ता ७५) वि. वि. आयईएस राजा शिवाजी विद्यालय ( दादर) ३१.४ षटकांत सर्वबाद ११९; प्रणय राणा ( १०२ चेंडूंत नाबाद १३७ धावा)
लोकपुरम पब्लिक स्कूल ( ठाणे) ३५.१ षटकांत ५ बाद १६४ ( आर्या पाडळे ३७*, यश सॅलियन ३५) वि. वि. साने गुरुजी इंग्लिश मीडियम स्कूल ३३ षटकांत सर्वबाद १६३; सामनावीर – आर्या पाडळे ( नाबाद ३७ धावा)
रायन इंटरनॅशनल आयसीएसई ( मालाड) ३५ षटकांत ९ बाद २३९ ( हीत शाह ३७*, ध्रुव दाफदा १४) वि. वि. रुस्तोमजी इंटरनॅशनल ( दहिसर) ४० षटकांत ९ बाद २२४; सामनावीर ध्रुव दाफदा ( ३ विकेट्स)