---Advertisement---

पुण्याचा ‘आशीर्वाद’ १५० किलोमीटरचा शेजारी मुंबईपेक्षा १८०० किलोमीटर दूर कोलकात्याला जास्त

On: गुरूवार, एप्रिल 7, 2022 6:09 PM
KKR-MI-MCA-Stadium
---Advertisement---

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२२चा चौदावा सामना खेळवला गेला. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेला हा सामना कोलकात्याने ५ विकेट्स राखून जिंकला. कोलकात्याचा पॅट कमिन्स संघाच्या विजयाच्या नायक ठरला. त्याने केवळ १४ चेंडूंमध्ये ताबडतोब अर्धशतक ठोकत मुंबईच्या तोंडून विजयाचा घास खेचला आणि मुंबईला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघाचा (Mumbai Indians) हा पुण्यातील स्टेडियमवर (Pune MCA Stadium) सहावा सामना होता आणि त्यांनी या मैदानावर पराभव पत्कारण्याची ही दुसरी वेळ होती. त्यांना आपले शेजारी शहर असलेल्या पुण्यात आतापर्यंत केवळ ४ सामने जिंकण्यात यश आले आहे. मुंबई ते पुणे शहरात जवळपास १५० किलोमीटरचे अंतर आहे. 

दुसरीकडे मुंबईपेक्षा कोलकाता संघाचे (Kolkata Knight Riders) पुण्याच्या स्टेडियमवरील आकडे चांगले राहिले आहेत. मुंबईविरुद्धचा सामना कोलकाताचा पुण्यातील स्टेडियमवरील सातवा सामना होता. विशेष म्हणजे, त्यांनी हा सामना जिंकत पुण्याच्या मैदानावरील आपला अजेय राहण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. कोलकाताने पुण्यामध्ये खेळलेले सर्वच्या सर्व ७ सामने जिंकले आहेत. त्यामुळे पुण्याचा ‘आशिर्वाद’ १५० किलोमीटरचा शेजारी मुंबईपेक्षा १८०० किलोमीटर दूर असलेल्या कोलकात्याला जास्त असल्याचे दिसते. (MI & KKR Records At Pune)

असा झाला कोलकाता आणि मुंबई सामना
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाला संघर्ष करावा लागला. त्यांनी निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत १६१ धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादव याने संघात पुनरागमन करत धुव्वादार अर्धशतकी खेळी केली. त्याने ३६ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५२ धावा करत एकट्याने मुंबईचा किल्ला लढवला.

मुंबईने दिलेल्या १६२ धावांचे आव्हान कोलकाता संघाने ५ विकेट्स गमावत सहजरीत्या १६ षटकातच पूर्ण केले. कोलकाताकडून वेंकटेश अय्यर आणि पॅट कमिन्स यांनी अर्धशतके केली. वेंकटेशने ४१ चेंडूंमध्ये नाबाद ५० धावा केल्या होत्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

लखनऊविरुद्ध वॉर्नरला संधी देत कर्णधार पंत स्वत:च्याच पायावर मारणार धोंडा! आकडे आहेत विरोधात

भाई-भाई! दीपक हुड्डाने बदलले सूर; कृणाल पंड्याबद्दल म्हणाला, ‘तो माझा भाऊ आहे’

मुंबईचा पराभव तर झालाच, पण रोहित शर्माच्या नावावर या नकोशा विक्रमाचीही नोंद, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---