---Advertisement---

‘भावा पँट तरी घालायची’ म्हणत मुंबईच्या सलामीवीराने कार्तिकला केले ट्रोल, मग त्यानेही ‘असे’ दिले प्रत्युत्तर

---Advertisement---

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आयपीएल स्पर्धेत देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता सर्व खेळाडू आपल्या घरी सुरक्षित पोहोचले आहेत. तसेच राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील सर्व नगिरकांना लस घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे क्रिकेटपटू देखील लस टोचून घेताना दिसून येत आहेत. नुकताच दिनेश कार्तिकने देखील कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली होती. या फोटोजवरून ख्रिस लीनने त्याला ट्रोल केले आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आल्यामुळे आपल्या घरी परतला आहे. तसेच घरी परतल्यावर त्याने कोरोना लस टोचून घेतली आहे. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो लस टोचून घेताना दिसून येत आहे. तसेच यावर त्याने कॅप्शन म्हणून “लस टोचून घेतली” असे लिहिले आहे.

या फोटोवर दिनेश कार्तिकला ट्रोल करत मुंबई इंडियन्स संघाचा तुफानी फलंदाज ख्रिस लीन याने लिहिले की, “कमीत कमी पँट तरी घालायची.”

या मजेशीर प्रतिक्रियेवर दिनेश कार्तिकने देखील सडेतोड उत्तर दिले आहे. त्याने लिहिले की, “मी देखील तुझ्यासारखी शॉर्ट्स घालण्याचा विचार करत होतो. परंतु नंतर मला आठवले की, मी मालदीवमध्ये नाहीये. त्यामुळे मी हे घातले. ”

दिनेश कार्तिक आणि ख्रिस लीन हे दोघेही कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये एकत्र खेळले आहेत. त्यामुळे ते अनेकदा मस्ती करताना दिसून आले आहेत. तसेच २०१९ मध्ये ख्रिस लीनने मुंबई इंडियन्स संघात एंट्री केली होती. परंतु त्याला आयपीएल २०२१ स्पर्धेत अवघा १ सामना खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने ४९ धावांची खेळी केली होती. तसेच दिनेश कार्तिकने देखील ७ सामन्यात अवघ्या १२३ धावा केल्या आहेत.

रहाणे आणि धवननेही घेतली लस

घरी पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रहाणे व त्याची पत्नी राधिका रहाणेने कोरोनाची लस घेतली होती. तसेच धवनने सर्वप्रथम ६ मे रोजी कोरोनाची लस घेतली होती. या सक्रिय भारतीय क्रिकेटपटूंआधी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात लस घेतली होती. त्यावेळी ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत होती. सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरूवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---