सर्वाधिक पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर इंडियन प्रीमिअर लीग 2023 सोडून इंग्लंडला परतला आहे. दुखापतीवरील इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या देखरेखीमुळे असे घडले आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी वाचून कोणाच्याही भुवया उंचावू शकतात. मुंबई इंडियन्स संघ मोठी योजना आखत असल्याची बातमी समोर येत आहे.
परदेशातील एका नामांकित वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या मालकीचा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ जोफ्रा आर्चर (Jofra Archer याला भरमसाठ मानधन देऊन वर्षभरासाठी आपल्यासोबत जोडू शकतो. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाला मुंबईकडून परवानगी घ्यावी लागेल. मुंबई इंडियन्सकडे वेगवेगळ्या देशातील पाच संघ (महिला संघासह) आहेत.
कराराच्या नियमानुसार, जोफ्रा आर्चरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जाण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला मुंबई इंडियन्सकडून परवानगी घ्यावे लागेल. एक वर्षाच्या करारांतर्गत आर्चर मुंबई इंडियन्सच्या इतर फ्रँचायझींसाठीही खेळताना दिसू शकतो.
मात्र, कराराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. हेदेखील पाहणे रंजक ठरेल की, आर्चर याच्याशी सहमत आहे की नाही. मागील दोन वर्षांमध्ये आर्चर खूपच कमी क्रिकेट खेळला आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी20 लीगमध्ये पुनरागमन करत त्याने 11 सामने खेळले होते. आयपीएलमध्येही तो जास्त खेळला नाहीये.
विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्स संघाने आर्चरच्या दुखापतीबाबत त्याला भक्कम पाठिंबा दिला. फिट नसूनही त्याला मागील वर्षी आयपीएल लिलावात सामील केले होते. इंग्लंडमध्ये ऍशेज मालिका होणार आहे, त्यासाठी ईसीबीला कोणतीही जोखीम उचलायची नाहीये. त्यामुळेच आर्चरला परतावे लागले आहे. हे वृत्त डेली मेलने दिले आहे.
मुंबई इंडियन्ससोबत वार्षिक कराराविषयी आर्चरशी कोणतीही चर्चा झाली नाहीये. मुंबईची योजना यशस्वी झाली, तर इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या चिंता वाढतील. सध्या मुंबई संघात आर्चरच्या जागी ख्रिस जॉर्डन याची एन्ट्री झाली आहे. त्याने एक सामनाही खेळला आहे. यामध्ये त्याला 4 षटके गोलंदाजी करताना 48 धावा खर्च करून 1 विकेटही घेण्यात यश आले आहे. (mumbai indians planning to offer a year full time contract to pacer jofra archer read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पृथ्वी शॉने अपेक्षेवर फेरले पाणी…’, CSKविरुद्धच्या पराभवानंतर रिकी पाँटिंगचे खळबळजनक वक्तव्य
सीएसके आणि जडेजातील मतभेत पुन्हा चव्हाट्यावर, सोशल मीडियावर लाईक केली ‘ही’ पोस्ट