इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये ५वेळचा आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्स गुणतालिकेत तळाशी आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये सलग पराभव पत्करला आहे. विशेष म्हणजे, मुंबईने आयपीएल २०२२च्या लिलावात संघात कोटी रुपयांमध्ये घेतलेल्या खेळाडूला बाहेर बसवले आहे. अशामध्ये मुंबई संघाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरनेही मुंबई संघाबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.
जाफर प्रश्न उपस्थित करत म्हणाला आहे की, जर तुम्ही एखाद्या खेळाडूला ८.२५ कोटी रुपयांमध्ये विकत घेता, तेव्हा त्याला १-२ सामने खेळवण्यापेक्षा तर चांगलेच आहे. खरं तर, जाफर याठिकाणी मुंबई संघातील टीम डेविड या खेळाडूबद्दल बोलत आहे. डेविडला मुंबई संघाने मेगा लिवावात ८.२५ कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले होते. डेविडची मूळ किंमत ४० लाख रुपये होती. मोठ्या शर्यतीनंतर मुंबईने डेविडला संघात घेतले होते. मात्र, आतापर्यंत मुंबईने त्याला फक्त २ सामन्यात खेळण्याची संधी दिलीये.
टीम डेविडने मुंबईसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामने खेळला आहे. यादरम्यान खेळताना त्याने १२ आणि १ धावाच केल्या आहेत. यानंतर त्याला संघात खेळण्याची संधी मिळाली नाहीये. मुंबईला संघात बदल करण्याचा फायदाही झाला नाहीये. कारण, संघाच्या पारड्यात सतत पराभव पडत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
टीम डेविड हा सिंगापूरचा खेळाडू आहे. त्याने मागील काही काळात चांगलीच वाहवा लुटली आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो अफलातून फलंदाजीमुळे चर्चेत आला होता. त्याने जवळपास १६०च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळेच डेविडवर आयपीएलच्या मेगा लिलावात इतकी जास्त बोली लागली होती. मात्र, तो आतापर्यंत फक्त २ सामन्यातच खेळला आहे. त्याला पूर्ण संधी मिळाली नाहीये. दुसरीकडे मुंबईने ३ कोटी रुपयात ‘बेबी एबी’ म्हणजे डेवाल्ड ब्रेविसला घेतले होते. तो या हंगामात चांगली कामगिरी करत आहे.
ब्रेविसने आतापर्यंत खेळलेल्या ३ आयपीएल सामन्यात २८.६७च्या सरासरीने ८६ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १५६.३६च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामन्यानंतर कर्णधार मयंक अगरवालला फलंदाजी टिप्स देताना दिसला सचिन तेंडुलकर, व्हिडिओ व्हायरल