इंडियन प्रीमियर लीगचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचा संघ आधीच यूएईला रवाना झाले होते. मुंबईचा संघ १३ ऑगस्टला यूएईला रवाना झाला होता. सुरुवातीचा एक आठवडा सर्व खेळाडूंना विलीनीकरणाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले. आता शुक्रवारी (२० ऑगस्ट) मुंबई इंडियन्स संघाचा विलीनीकरणाचा काळ संपणार आहे. यानंतर ते त्यांच्या पहिल्या सराव शिबिराचे आयोजन करणार आहे.
https://www.instagram.com/p/CStrq1esJ8U/?utm_source=ig_web_button_share_sheet
याआधी मुंबई इंडियन्सच्या अधिकृत अकाउंटवरून पियुष चावलाचा फोटो शेअर केला गेला आहे. ज्यात चावला त्याच्या परिवारासोबत भोजन करताना दिसत आहे. तसेच हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांनी अबुधाबीच्या हॉटेलवरून त्यांचा फोटो शेअर केला आहे. तसेच मुंबई इंडियन्सला स्थानिक आरोग्य विभागाकडून विलगीकरणाच्या काळात ‘जीपीएस’ असलेले घड्याळ देण्यात आले होते. ज्याद्वारे यांच्या संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामुळे कोरोना काळात कोणत्याही समस्यांपासून वाचण्यास मदत होऊ शकते.
IPL 2021: Mumbai Indians given GPS watches by health department for quarantine period in Abu Dhabi
Read @ANI Story | https://t.co/3Q58At4S2v#IPL2021 #MumbaiIndians #abudhabi pic.twitter.com/U2XGqr9DrR
— ANI Digital (@ani_digital) August 14, 2021
दरम्यान, यूएईला रवाना होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ रिलायंस कॉर्पोरेट पार्कमध्ये असलेल्या ‘जिओ स्टेडियम’मध्ये सराव करत होता. सर्व खेळाडू अबुधाबीच्या एका हॉटेलमध्ये विलगीकरणात होते. यादरम्यान सर्व खेळाडूंची नियमितपणे कोरोनाची चाचणी केली गेली आहे. त्यामध्ये चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडू अबुधाबीच्या मैदानात सरावासाठी उतरण्यास सज्ज झाले आहेत.
𝑺𝒕𝒓𝒂𝒊𝒈𝒉𝒕 𝒐𝒖𝒕𝒕𝒂 𝒒𝒖𝒂𝒓𝒂𝒏𝒕𝒊𝒏𝒆 ➡️ 𝕋𝔼𝔸𝕄 ℝ𝕆𝕆𝕄
Paltan, send us a 💙 if you want a tour of this special place🤩#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 pic.twitter.com/WzEFLloyID
— Mumbai Indians (@mipaltan) August 19, 2021
😄 ❌ 🥴 ✅
You know the drill. Tag that friend who is responsible for spoiling your pictures 🤣📸#OneFamily #MumbaiIndians #WorldPhotographyDay @rdchahar1 pic.twitter.com/18ClkLgrd5
— Mumbai Indians (@mipaltan) August 19, 2021
https://www.instagram.com/p/CSthoH0nN2L/?utm_source=ig_web_button_share_sheet
पहिल्या टप्प्यात आयपीएलचे एकूण २९ सामने झाले होते. ज्यात मुंबई इंडियन्सने ७ सामन्यांपैकी ३ सामने जिंकले होते. त्यामुळे ६ गुणांसह मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत ४ थ्या स्थानावर आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. यात उर्वरित ३१ सामने खेळवले जाणार आहेत. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–‘हे’ २ शिलेदार विराटला देणार धक्का, युएईतील राहिलेल्या आयपीएल हंगामातून घेऊ शकतात माघार
–नुकतीच ठोकलीत २ शतके, आता थेट टी२० विश्वचषकातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार ‘जोश इंग्लिश’; वाचा त्याच्याबद्दल
–कोहलीची ‘विराट’ दूरदृष्टी! २०१५ मध्येच केला होता भारताला सर्वोत्कृष्ट कसोटी संघ बनवण्याचा संकल्प