---Advertisement---

मुंबई इंडियन्ससाठी खूशखबर! आर्चरचे मैदानात पुनरागमन; पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, मार्च 10, 2022 8:40 PM
---Advertisement---

कोपराच्या दुखापतीमुळे दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर असलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) पुन्हा एकदा मैदानावर परतला आहे. आयपीएलमधील त्याचा संघ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर इंग्लंडच्या या खेळाडूचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या लिलावात मुंबईने आर्चरला आपल्या संघात सामील करून घेतले होते. तो यावर्षी निवडीसाठी उपलब्ध नसणार हे माहीत असतानाही तब्बल ८ कोटी रुपये खर्च करून त्याचा संघात समावेश केला गेला. मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आर्चर फलंदाजी करताना दिसत आहे.

जोफ्रा आर्चरने लिलावात आपले नाव देण्याआधीच स्पष्ट केले होते की, तो आयपीएल २०२२ मध्ये खेळणार नाही. असे असतानाही मुंबई इंडियन्सने आयपीएल लिलावात (IPL 2022 Mega Auction) त्याला आठ कोटी रुपये देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. आर्चरने यापूर्वी मेगा लिलावासाठी आपले नाव दिले नव्हते. मात्र, नंतर त्याने नोंदणी केली. प्रत्यक्ष लिलावात त्याचा पूर्वीचा संघ, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद व मुंबई इंडियन्सने त्यांच्यासाठी बोली लावली.

https://twitter.com/mipaltan/status/1501807564698226691?t=m9mfIH744qyG3u_Z7S4phg&s=19

आर्चर २०१८ ते २०२० अशी तीन वर्षे राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. तर, २०२१ मध्ये दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. २०२० आयपीएलमध्ये तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. वेगवान गोलंदाजीसह तो आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

आयपीएलचा पुढील हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. या हंगामाचा अंतिम सामना २९ मे रोजी होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने या हंगामातील सर्व सामने महाराष्ट्रात (मुंबई व पुणे) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने लीग सामन्याचे ठिकाण आणि तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र, बाद फेरीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

आख्ख्या इंग्लंड संघाने मार्क वूडला केले दुर्लक्षित; तर पठ्ठ्याने दिली ‘अशी’ रिऍक्शन, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट (mahasports.in)

कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडण्यासाठी आयपीएल १५ सज्ज; बीसीसीआय करणार तब्बल ८०० रुपयांची कमाई? (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---