---Advertisement---

मुंबई इंडियन्सने शेअर केला सचिन-जयसूर्या जोडीचा जुना फोटो, आकर्षक कॅप्शनसह वेधले सर्वांचेच लक्ष

On: बुधवार, नोव्हेंबर 24, 2021 7:32 PM
---Advertisement---

मंगळवारी (२३ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोन मोठे खेळाडू दिसत आहेत. या छायाचित्रात सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्या मुंबई इंडियन्सच्या जुन्या जर्सीत दिसत आहेत. या दोन्ही खेळाडूंनी ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात क्रिकेटवर एकतर्फी राज्य केले होते. दोघेही त्यांच्या काळातील महान खेळाडू होते. आयपीएलच्या पहिल्याच लिलावात श्रीलंकेचा हा दिग्गज सलामीवीर मुंबई इंडियन्सने विकत घेतला होता.

ट्विटरवर मुंबई इंडियन्सने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘या दोन सलामीवीरांची फलंदाजी तुम्हाला आठवत असेल, तर आता तुम्ही अधिकृतपणे वृद्ध झाला आहात.’

https://twitter.com/mipaltan/status/1463085991061704712?s=20

जयसूर्यानेही या फोटोला रिपोस्ट करत लिहिले आहे की, ‘अविस्मरणीय आठवणी.’

https://twitter.com/Sanath07/status/1463112476220739586?s=20

सचिन, जयसूर्यासह दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज शॉन पोलॉकही त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघात होता. त्याच्याशिवाय वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो आणि ड्वेन स्मिथही या संघाचा भाग होते. आयपीएलच्या पहिल्या हंगामात हरभजन सिंग, आशिष नेहरा, मनीष पांडे आणि रॉबिन उथप्पा हे देखील मुंबई संघात होते. पण या संघासाठी सर्वात मोठा खेळाडू ठरला तो लसिथ मलिंगा. त्याच्याकडे अजूनही आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स आहेत.

दरम्यान सचिनच्या आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, त्याने मुंबई इंडियन्सकडून ७८ आयपीएल सामने खेळताना २३३४ धावा केल्या होत्या. ३३.८३ च्या सरासरीने फलंदाजी करताना त्याने या धावा चोपल्या होत्या. यादरम्यान त्याने एक शतकही झळकावले आहे. तसेच त्याच्या नावे आयपीएलमध्ये १३ अर्धशतकही आहेत. तसेच जयसूर्यानेही ३० आयपीएल सामने खेळताना ७६८ धावा आणि १३ विकेट्स घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रेयसने व्हिडिओद्वारे दाखवला रुग्णालयापासून कसोटी पदार्पणापर्यंतचा प्रवास; व्हिडिओ नक्की पाहा

पहिल्या कसोटीसाठी विराट, रोहितला विश्रांती दिल्याने भडकला ‘हा’ दिग्गज; व्यक्त केली नाराजी

भुवनेश्वरच्या घरी आली ‘नन्ही परी’! पत्नी नूपुरने दिला मुलीला जन्म

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---