आयपीएल २०२२मधील ५१व्या सामन्यात रोहित शर्मा याने शानदार कामगिरी केली. शुक्रवारी (दि. ०६ मे) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबईकडून फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि इशान किशनने डावाची सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचली. राशिद खानने रोहितला पायचीत करत ही भागीदारी तोडली. मात्र, रोहितने यादरम्यान एक खास कारनामा आपल्या नावावर केला. अशी कामगिरी करणारा तो मुंबईचा दुसराच खेळाडू बनला. (Most Sixes For Mumbai Indian In IPL)
‘हिटमॅन’ नावाने प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) यादरम्यान फलंदाजी करताना सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. त्याने २८ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ५ चौकारांचा पाऊस पाडत ४३ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने मारलेल्या २ षटकारांमुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. खरं तर, रोहित मुंबई इंडियन्ससाठी २०० षटकार पूर्ण करणारा कायरन पोलार्डनंतरचा (Kieron Pollard) दुसरा खेळाडू बनला. पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून आतापर्यंत २५७ षटकार मारले आहेत.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
२५७ षटकार- कायरन पोलार्ड
२०१ षटकार- रोहित शर्मा*
९८ षटकार- हार्दिक पंड्या
दुसरीकडे आयपीएल इतिहासात कोणत्याही एका फ्रँचायझीसाठी २०० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहितचा पाचवा क्रमांक लागतो. या यादीत अव्वल क्रमांकावर ख्रिस गेल होता. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना २०० किंवा त्याहून अधिक षटकार मारले होते. या यादीत दुसऱ्या स्थानी एबी डिविलियर्स आहे. त्यानेही २०० किंवा त्याहून अधिक षटकार मारत हा कारनामा केला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीदेखील या यादीत सामील आहे. विराट तिसऱ्या क्रमांकावर असून त्यानेही २०० किंवा त्याहून अधिक षटकार मारले होते. यानंतर चौथ्या क्रमांकावर कायरन पोलार्ड आणि पाचव्या स्थानी आता रोहित शर्मा पोहोचला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
१. ख्रिस गेल
२. एबी डिविलियर्स
३. विराट कोहली
४. कायरन पोलार्ड
५. रोहित शर्मा*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू पुढच्या वर्षी गुजरातमध्ये येऊ शकतो’, हार्दिक पंड्याची मुंबईच्या जुन्या सहकाऱ्याला खुली ऑफर
वॉर्नरने सामनावीर पुरस्कार जिंकताच साधली ‘हिटमॅन’ची बरोबरी, तर धोनी पडला मागे






