इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 साठी बीसीसीआयने शुक्रवारी (23 डिसेंबर) लिलाव आयोजित केला होता. लिलावात भारतीय आणि विदेशातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. खेळाडूंवर कोट्यावधी रुपये याठिकाणी खर्च केले गेले. आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने देखील लिलावात एकूण 8 खेळाडू खरेदी केले. ऑस्ट्रेलियाच्या कॅमरुन ग्रीन साठी मुंबई फ्रँचायजीने सर्वाधिक 17.50 कोटी रुपये खर्च केले. परिणामी त्यांचा संघ पूर्ण होऊ शकला नाही.
बीसीसीआयने खेळाडूंचा हा लिलाव कोचीमध्ये आयोजित केला असून यामध्ये सर्व फ्रँचायजी आणि त्यांचे मालक उपस्थित होते. मुंबई इंडियन्सने या लिलावात कॅमरुन ग्रीन (Cameron Green) व्यतिरिक्त झाय रिचर्डसन यालाही 1.50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. फ्रँचायजीने खरेदी केलेल्या इतर सहा खेळाडूंची किंमत मात्र एक कोटी रुपयांच्या आतमध्येच होती. मुंबई इंडियन्स मागच्या मोठ्या काळापासून कॅमरुन ग्रीनला संघात सामील करण्याच्या प्रयत्नात आहे. अखेर शुक्रवारी त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. पण यासाठी त्यांना तब्बल 17.50 कोटी खर्च करावे लागेल. परिणाम फ्रँचायझीला 25 खेळाडूंचा संघ देखील पूर्ण करता आला नाही. मुंबई इंडियन्समध्ये आता एकूण 24 खेळाडू आहेत.
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ –
रिटेन लेलेले खेळाडू –
आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, ऋतिक शौकीन, ईशान किशन, जेसन बेहरनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय सिंग, मोहम्मद अरशद खान, तिलक वर्मा, रमनदीप सिंग, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, ट्रिस्टन स्टब्स.
लिलावात खरेदी केलेले खेळाडू-
कॅमरून ग्रीन (17.50 कोटी), झाय रिचर्डसन (1.50 कोटी), पीयूष चावला (50 लाख), डुआन जॅनसन (20 लाख), विष्णु विनोद (20 लाख), शम्स मुलानी (20 लाख), नेहल वधेरा (20 लाख), राघव गोयल (20 लाख). (Mumbai Indians spend Rs 17.50 crore on Cameron Green, they run out of money, see full squad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वीरेंद्र सेहवागच्या भाच्याची आयपीएलमध्ये चांदी, ‘या’ संघाने पाण्यासारखा पैसा खर्चत घेतलं ताफ्यात
CSK Full Squad | बेन स्टोक्ससह ‘हे’ सात खेळाडू सीएसकेच्या ताफ्यात सामील, ‘असा’ आहे संपूर्ण संघ