---Advertisement---

काय सांगता ! हिटमॅन रोहित शर्माचा २६४ धावांचा विक्रम मोडला

On: शुक्रवार, मार्च 1, 2019 5:48 PM
---Advertisement---

आंतरराष्टीय वनडेमध्ये सर्वोच्च धावा करणाऱ्या रोहित शर्माचा विश्वविक्रम शालेय युवा क्रिकेटपटू अभिनव सिंगने मोडला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सनेही रोहितला मजेने डिवचले आहे.

रोहितने आत्तापर्यंत वनडेमध्ये तीन द्विशतके केली आहेत. त्यातील 264 धावांची त्याची खेळी ही वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी आहे. पण हा विक्रम मुंबईच्या इंटर स्कूल स्पर्धेत खेळताना रिझवी स्प्रिंगफिल्ड संघाच्या अभिनवने 265 धावांची खेळी करत मोडला आहे.

असे असले तरी आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये मात्र रोहितचा हा विश्वविक्रम कायम आहे. रोहितने 13 नोव्हेंबर 2014ला इडन गार्डन, कोलकता येथे श्रीलंका विरुद्ध खेळताना 173 चेंडूत 264 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 33 चौकार आणि 9 षटकार मारले होते.

अभिनवने केलेल्या 265 धावांच्या खेळीनंतर आयपीएलमधील संघ मुंबई इंडियन्सने गमतीशीर ट्विट केला आहे की ‘रोहित आम्हाला तो व्यक्ती भेटला आहे ज्याने तूझा 264 धावांचा विक्रम मोडला आहे. मुंबईच्या इंटर स्कूल स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफिल्डच्या अभिनव सिंगने 265 धावा करत त्याच्या संघाला विजय मिळवून दिला.’

परंतू अजून यावर रोहितची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

रोहित सध्या भारतीय संघासोबत असून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात उद्यापासून(2 मार्च) 5 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हैद्राबाद येथे होणार आहे.

तसेच या मालिकेनंतर 23 मार्चपासून आयपीएलच्या 12 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या मोसमातील मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला दिल्ली कॅपिटल्स संघा विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पहिल्या वनडेत धोनीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, टीम इंडियाला मोठा धक्का

मुंबईकर रोहित शर्मासाठी उद्याचा वनडे सामना ठरणार खास

एकाच दिवसात झाली तब्बल ६८ षटकारांची बरसात…

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment