सध्या भारतात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे (Syed Mushtaq Ali Trophy 2022-2023) सामने खेळले जात आहेत. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या या स्पर्धेत अनेक युवा खेळाडू आपला जोश दाखवतायेत. त्याचवेळी यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघासाठी शानदार कामगिरी केलेला हैदराबादचा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varma) याने देखील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी गाजवली आहे. स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात त्याने हैदराबाद संघाला अडचणीतून बाहेर काढत चारही सामन्यात अर्धशतके ठोकली.
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 2020 अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वचषकात चमकदार कामगिरी केलेल्या तिलक वर्मा याला यावर्षी मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये संधी दिली होती. तब्बल एक कोटी सत्तर लाखांची घसघशीत रक्कम त्याला मिळालेली. त्याने आपली ही किंमत वसूल करून देत मुंबई इंडियन्ससाठी सर्वोत्तम कामगिरी केली.
तिलकने आयपीएल 2022 मध्ये 14 सामने खेळताना 36.09 अशा उत्कृष्ट सरासरीने 397 धावा उभारल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेटही 131 पेक्षा जास्त राहिला.
त्यानंतर आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने हैदराबादसाठी चमकदार कामगिरी केली आहे. पंजाब विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शून्य धावावर दोन गडी बाद असताना त्याने मैदानावर येत 38 चेंडूंवर अर्धशतकी खेळी केली. पॉंडेचेरीविरुद्ध दुसऱ्या सामन्यात 41 चेंडूंवर त्याने शानदार 57 धावा चोपल्या. गोव्याविरुद्ध देखील त्याच्या 46 चेंडूतील 62 धावांमुळे संघाने सामना आपल्याला केला होता. चौथ्या फेरीच्या सामन्यात त्रिपुराविरुद्ध त्याने 46 चेंडूत 67 धावा करत संघाला सलग तिसरा विजय मिळवून दिला.
आयपीएल पाठोपाठ आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील कामगिरी सातत्य ठेवल्याने तिलक वर्मा हा भारतीय संघात येण्यासाठी दावेदारी पेश करताना दिसतोय. भारतीय संघ व्यवस्थापनाने मागील काही काळात सातत्याने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे तिलक हा देखील लवकरच भारतीय संघाच्या निळ्या जर्सी दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! कोरोना झाला, तरी टेन्शन नाही; टी20 विश्वचषकात बिनधास्त खेळू शकतात खेळाडू
भारत-पाक ‘क्रिकेटयुद्ध’ होणाऱ्या एमसीजीचा काय आहे इतिहास? कशी आहे आकडेवारी? वाचा सविस्तर