मागील काही वर्षांत अनेक खेळाडूंवर चरित्रपट आले आहे. पण आता मुंबई इंडियन्स या संघावर अधारित नेटफ्लिक्सची डॉक्यूमेंट्री सिरीज सर्वांसमोर येणार आहे.
या डॉक्यूमेंटरीचे नाव ‘क्रिकेट फिव्हर: मुंबई इंडियन्स’ असे आहे. 1 मार्च 2019 पासून या 8 भागांमध्ये असलेल्या या डॉक्यूमेंट्री सिरीजला सुरुवात होणार आहे.
Sleepless nights? Nervous nail biting? Screaming at your screen?
If you’ve experienced any or all of these symptoms you might have Cricket Fever, premieres 1st March. pic.twitter.com/Ujl1tq6Els— Netflix India (@NetflixIndia) February 5, 2019
याबद्दल नेटफ्लिक्सने ट्विटरवर घोषणा केली आहे. या डॉक्यूमेंट्रीमध्ये मैदानाबाहेरील आणि मैदानातील घडामोडी दाखवण्यात येणार आहेत. या डॉक्यूमेंट्रीची सुरुवात 2018 च्या लिलावापासून होणार असून त्यावेळी सर्व संघ एकत्र जमलेला असतो. तेथून सुरुवात झालेला हा प्रवास मोसम संपेपर्यंत 8 भागात दाखवण्यात येणार आहे.
त्याचबरोबर यात खेळाडू मैदानात कशाप्रकारे दबाव सांभाळतात आणि लाखो चाहत्यांच्या आपेक्षांना कसे सामोरे जातात हे देखील चाहत्यांना पहायला मिळणार आहे.
मुंबई इंडियन्स या संघाचे संघमालक निता अंबानी आणि अकाश अंबानी हे आहेत, तर कर्णधार रोहित शर्मा आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी श्रीलंकेचा दिग्गज माजी क्रिकेटपटू माहेला जयवर्धने आहे. मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत 2012, 2015 आणि 2017 या वर्षी आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–टी२० मालिकेत टीम इंडियाला विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची संधी
–धोनीपासून वाचण्यासाठी आयसीसीने फलंदाजांना दिला हा खास सल्ला
–एकेकाळी यो-यो टेस्टही पास न होणारा खेळाडू झाला टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू