चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाची सुरुवात येत्या ९ एप्रिलपासून होणार आहे. त्यामुळे केवळ ९ दिवस राहिलेल्या या हंगामाची आतुरता सर्वच संघातून दिसून येत आहे. प्रत्येक संघात त्यांच्या जवळपास सर्व खेळाडू दाखल झाले असून प्रत्येक संघाने कसून सरावालाही सुरुवात केली आहे. तसेच आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स देखील या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांसाठी चेन्नईला पोहचला आहे.
मुंबईच्या मोहिमेला चेन्नईपासून सुरुवात
आयपीएल २०२१ चे आयोजन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने ते थोडे वेगळ्याप्रकारे करण्यात आले आहे. यंदा कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक संघ साखळी फेरीदरम्यान केवळ ३ वेळाच प्रवास करेल अशा प्रकारे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही संघ यंदा आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही.
त्यामुळे मुंबई इंडियन्यची आयपीएल २०२१ची मोहिम यंदा चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममधून सुरु होईल. मुंबईला पहिले ५ सामने चेन्नईमध्ये खेळायचे आहे. मुंबईचा पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध ९ एप्रिलला होईल. मुंबईला चेन्नईनंतर दिल्लीमध्ये ४ साखळी फेरीचे सामने खेळायचे आहेत. त्यानंतर मुंबईचे साखळी फेरीतील ३ सामने बेंगळुरुमध्ये आणि २ सामने कोलकातामध्ये साखळी फेरीचे सामने होतील.
मुंबईचा संघ चेन्नईत पोहचला
आयपीएल २०२१ मधील पहिले पाच सामने चेन्नईत होणार असल्याने मुंबईचा संघ ३१ मार्चला चेन्नईला पोहचला आहे. मुंबई इंडियन्सने त्यांचे खेळाडू चेन्नईला पोहचल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा देखील चेन्नईला पोहचल्यानंतरचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित तमिळ भाषेत बोलत आहे. रोहित म्हणत आहे की ‘नमस्कार चेन्नई. मुंबई इंडियन्स इथे आले आहेत.’
Chenn-hi ????#OneFamily has arrived ????#MumbaiIndians #IPL2021 @ImRo45 pic.twitter.com/6Yu0EvXP2k
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2021
Touchdown, Chennai! ????????#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @hardikpandya7 @Jaspritbumrah93 @ishankishan51 pic.twitter.com/tZOs2IfBjT
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2021
आयपीएल २०२१ साठी मुंबईने लाँच केली नवी जर्सी
काहीदिवसांपूर्वीच मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२१ च्या हंगामासाठी नवी जर्सी लाँच केली आहे. मुंबई इंडियन्सची नवी जर्सी शंतनू आणि निखिल या प्रसिद्ध फॅशन डिझायनरने डिझाईन केली आहे. त्याचबरोबर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायु आणि आकाश या पंचभूतांचे प्रतिनिधित्व केले जाईल अशी जर्सीची रचना करण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्सची नवी जर्सी नेहमीप्रमाणे गडद निळ्या रंगामध्येच आहे. तसेच या जर्साच्या खांद्यावर आणि कंबरेच्या बाजूला सोनेरी रंगाची डिझाईन आहे. तसेच हाताच्या खालच्या बाजूला आणि कॉलरच्या खालच्या बाजूला केशरी रंगाची बॉर्डर आहे.
असे आहेत आयपीएल २०२१ मधील मुंबई इंडियन्सचे साखळी फेरीतील सामने –
९ एप्रिल – चेन्नई, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी ७.३० वाजता
१३ एप्रिल – चेन्नई, केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१७ एप्रिल- चेन्नई, मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
२० एप्रिल- चेन्नई, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ एप्रिल – चेन्नई, पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२९ एप्रिल – दिल्ली, मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी ३.३० वाजता
१ मे – दिल्ली, मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
४ मे – दिल्ली, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
८ मे – दिल्ली, राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१० मे – बंगळुरू, मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१३ मे – बंगळुरू, मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, दुपारी ३.३० वाजता
१६ मे – बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२० मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – कोलकाता, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वाजता
महत्त्वाच्या बातम्या –
यंदा केकेआर आयपीएल विजेतेपद जिंकणार का? शाहरुख खानने दिले भन्नाट उत्तर
वयाच्या २३ व्या वर्षी आयपीएलमध्ये नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर रिषभ पंत म्हणाला…






