---Advertisement---

वयाच्या २३ व्या वर्षी आयपीएलमध्ये नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर रिषभ पंत म्हणाला…

On: बुधवार, मार्च 31, 2021 10:19 PM
---Advertisement---

येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्स हा संघ १० एप्रिलला ३ वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी पहिला सामना खेळणार आहे. मात्र हा हंगाम सुरु होण्याआधीच त्यांचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने या हंगामाला मुकणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामासाठी दिल्लीने २३ वर्षीय रिषभ पंतवर विश्वास दाखवत त्याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.

ही जबाबदारी मिळाल्यानंतर रिषभ पंतने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या प्रतिक्रियाचा व्हिडिओ त्याने स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केला आहे. याबरोबरच हा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सनेही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना रिषभने कॅप्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग तसेच दिल्ली संघाचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले आहे की ‘मी मागील काही वर्षापासून ज्या संघाचा भाग आहे, त्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. रिकी पाँटिंग, कोचिंग स्टाफ, संघव्यवस्थापन, माझे संघसहकारी आणि चाहत्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद.’

https://twitter.com/RishabhPant17/status/1377157908337623040

तसेच या व्हिडिओमध्ये रिषभने म्हटले आहे की ‘दिल्ली कॅपिटल्स माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद. मी प्रत्येकदिवशी माझ्या क्षमतेच्या १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करेल. आशा आहे की यंदा आपण आपल्या मर्यादा ओलांडत जिंकू. दिल्लीच्या चाहत्यांनो आम्हाला पाठिंबा देत राहा.’

https://twitter.com/DelhiCapitals/status/1377165900491595780

पंत आहे चांगल्या फॉर्ममध्ये

पंत गेल्या काही सामन्यांमध्ये तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका गाजवल्यानंतर मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या तीन्ही प्रकारच्या क्रिकेट मालिकांमध्येही दमदार प्रदर्शन केले. त्याने यावर्षी एकूण १३ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५५.१४ च्या सरासरीने ७७२ धावा धावा केल्या आहेत. त्याने १ शतक आणि ६ अर्धशतके यावर्षी केली आहेत. शिवाय तो यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दिल्लीचा पहिल्या विजेतेपदाची प्रतिक्षा 

दिल्ली संघ आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. मात्र त्यांना अद्याप विजेतेपद जिंकता आलेले नाही. पण गेल्या दोम हंगामात दिल्लीने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली होती. २०१९ च्या हंगामात दिल्ली संघ तिसऱ्या क्रमांकावर होता. तर २०२० च्या हंगामात दिल्लीने पहिल्यांदाच अंतिम सामन्यात प्रवेश करण्यात यश मिळवले होते. पण मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्लीला पराभूत केले. आता या हंगामात रिषभच्या नेतृत्वाखाली दिल्ली कशी कामगिरी करणार हे पाहावे लागेल.

रिषभची आयपीएलमधील कामगिरी 

रिषभ २०१६ हंगामापासून दिल्ली संघाचा भाग आहे. आत्तापर्यंत त्याने ६८ आयपीएल सामने खेळले असून ३५.२३ च्या सरासरीने १ शतक आणि २० अर्धशतकांसह २०७९ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ कारणामुळे चेन्नई सुपर किंग्ज करेल संघर्ष, भारतीय दिग्गजाने व्यक्त केले मत

वसीम अक्रमचे अंतवस्त्रातील फोटो झाले व्हायरल, पत्नीने ट्रोल करत विचारले, “हे सामान्य आहे का?”

एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---