---Advertisement---

वसीम अक्रमचे अंतवस्त्रातील फोटो झाले व्हायरल, पत्नीने ट्रोल करत विचारले, “हे सामान्य आहे का?”

On: बुधवार, मार्च 31, 2021 8:33 PM
---Advertisement---

भारतभरात २९ मार्चला धूळवड साजरी करण्यात आली. याबद्दल अनेक सेलिब्रटींनी सोशल मीडियावर शुभेच्छ दिल्या. दरम्यान धूळवडीनिमित्ताने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हा त्याच्या एका जुन्या फोटोमुळे चर्चेत आला आहे.

क्रीडा सादरकर्ता गौतम भीमानी यांनी आपल्या ट्विटरवर एक छायाचित्र चित्र शेअर केले आणि लिहिले की, “माझी आवडत्या क्रिकेट होळीची आठवण.” त्यावेळी भारत आणि पाकिस्तान संघातील खेळाडूंनी पुलामध्ये होळी खेळली होती. भीमानींचा हा फोटो लोकांना खूप आवडला. पण वसीमची पत्नी शनायरा अक्रमने वसीमला ट्रोल केले आहे.

या छायाचित्रात भीमणींच्या समवेत वसीम अक्रम उपस्थित असून या छायाचित्रात अक्रमने फक्त अंतवस्त्र घातलेली दिसत आहेत. त्याच्या चेहर्‍यावर लाल रंग लावलेला आहे. अक्रमने हे छायाचित्र पुन्हा रिट्विट केले आणि लिहिले की, “होळीच्या शुभेच्छा. काय दिवस होता तो भारताचा 1987 च्या दौऱ्याचा.”

साल 1987 मध्ये पाकिस्तानचा संघ इम्रान खानच्या नेतृत्वाखाली भारत दौर्‍यावर आला होता. त्यामध्ये त्यांनी पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती. त्यावेळी वसीम अक्रम हा देखील पाकिस्तान संघाचा सदस्य होता आणि त्यावेळी तो फक्त 20 वर्षांचा होता.

फोटोवर भाष्य करताना शनायराने लिहिले की, ”जेव्हा मी ट्विटर उघडले तेव्हा मला माझ्या पतीचा अंतवस्त्रामध्ये असलेला एक फोटो दिसला. हे सामान्य आहे का?” यावर अक्रमने उत्तर देताना लिहिले की, “ही नवीन गोष्ट सामान्य आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की ती शॉर्टस् होते.” याशिवाय अनेक चाहत्यांनीही अक्रमच्या या फोटोवर भाष्य केले.

साल 1987 मध्ये खेळल्या गेलेल्या या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानने 1-0 असा विजय मिळवला होता. मालिकेचे पहिले 4 कसोटी सामने अनिर्णीत राहिले होते. बंगळुरु येथे खेळल्या गेलेल्या अंतिम रोमाचंक कसोटी सामन्यात पाकिस्तानने भारताला 16 धावांनी पराभूत करून मालिका जिंकली. या सामन्यात अक्रमने दोन गडी बाद केले होते. या मालिकेत त्याने 5 सामन्यात 13 गडी बाद केले होते. पाकिस्तानकडून सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा खेळाडू होता.

महत्त्वाच्या बातम्या –

एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना

रोहितची चिमुकली हेल्मेट घालून करतीये त्याच्या पुल शॉटची नक्कल, पाहा क्यूट व्हिडिओ

याला म्हणतात नशीब! लिलावात खरेदीदार न मिळालेल्या रॉयचा आयपीएल २०२१साठी ‘या’ संघात झाला समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---