इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सर्व संघांची तयारी सुरु झाली आहे. असे असतानाच आता या आयपीएलच्या हंगामाबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी आयपीएलबद्दल विविधमते मांडायला सुरुवात केली आहे. यात माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रानेही चेन्नई सुपर किंग्जबद्दल मोठे भाष्य केले आहे.
आकाश चोप्रा यांचे असे मत आहे की, चेन्नई सुपर किंग्ज संघ इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल 2021) मध्ये संघर्ष करताना दिसणार आहे. कारण सीएसके संघातील बहुतेक खेळाडूंनी बरेच दिवस झाले क्रिकेट खेळलेले नाही. तर इतर संघातील खेळाडू कुठे ना कुठे खेळले आहेत.
आकाश चोप्रा यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, सुरेश रैना, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनीसारखे खेळाडू खूप दिवस झाले आंतरराष्ट्रीय किंवा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये खेळले नाहीत. तसेच दुखापतीमुळे रविंद्र जडेजाही काही काळ क्रिकेट पासून दूर होता. सातपैकी चार खेळाडू चांगली कामगिरी व स्पर्धात्मक क्रिकेट खेळले नाहीत.
चोप्रा यांचे असे म्हणणे आहे की, ‘घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेले रॉबिन उथप्पा आणि ऋतूराज गायकवाड हे दोघे खेळू शकतात. तसेच फाफ डू प्लेसीसही उत्तम कामगिरी करू शकतो. पण उर्वरित चार जणांचे काय? हे एक संघासाठी आव्हान असेल. मला असे वाटते की, सीएसकेने रवींद्र जडेजाला प्रोत्साहन द्यावे आणि फलंदाजीची जास्त संधी द्यावी. महेंद्रसिंग धोनीही उत्तम कामगिरी करेल. तसेच रैना जर तो मैदानात धावला तर सीएसकेसाठी चांगले आहे. परंतु तो ही बराच काळ खेळला नसल्याने मला वाटते की, सीएसकेचा संघ या हंगामात संघर्ष करताना दिसणार आहे.’
तसेच या संघातील शेन वॉटसनही गेल्या वर्षी नंतर निवृत्त झाला आहे. केदार जाधवला संघातून बाहेर करण्यात आले आहे. यावेळी मोईन अली, चेतेश्वर पुजारा या स्टार खेळाडूंचा चेन्नई संघात समावेश करण्यात आला आहे. मागील हंगामात सुरेश रैना नव्हता परंतु यावेळी तो खेळताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वसीम अक्रमचे अंतवस्त्रातील फोटो झाले व्हायरल, पत्नीने ट्रोल करत विचारले, “हे सामान्य आहे का?”
एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना
रोहितची चिमुकली हेल्मेट घालून करतीये त्याच्या पुल शॉटची नक्कल, पाहा क्यूट व्हिडिओ