अहमदाबादमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना काल (१४ मार्च) खेळला गेला. या सामन्यासाठी भारतीय संघात युवा फलंदाज ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना संधी देण्यात आली. या दोघांनीही आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर आयपीएलमध्ये ते खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाची डोकेदुखी वाढली आहे.
सूर्यकुमार आणि ईशानने केले आंतरराष्ट्रीय पदार्पण
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी२० सामना भारतीय संघाने अक्षर पटेल व शिखर धवन यांना विश्रांती ईशान किशन व सूर्यकुमार यादव यांना संधी दिली. ईशान व सूर्यकुमार भारताकडून टी२० क्रिकेट खेळणारे अनुक्रमे ८४ आणि ८५ वे खेळाडू बनले. सूर्यकुमारला या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही. मात्र, ईशानने सलामीला येत ५६ धावांची खेळी करून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
मुंबई इंडियन्ससाठी वाढली डोकेदुखी
ईशान व सूर्यकुमार यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्याने आयपीएलमध्ये ते खेळत असलेल्या मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली आहे. कारण, आयपीएल २०२२ साठी ते या दोघांना आपल्या संघात रिटेन करू शकणार नाहीत. आयपीएलच्या नियमानुसार, भारतासाठी खेळलेले अवघे तीन खेळाडू कोणत्याही फ्रेंचायसीला रिटेन करता येतात. अशा परिस्थितीत, मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन कर्णधार रोहित शर्मा, प्रमुख अष्टपैलु हार्दिक पंड्या व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना रिटेन करण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सला सूर्यकुमार यादव व ईशान किशन यांना आपल्या संघात घ्यायचे असेल तर, मोठी बोली लावावी लागेल.
खेळाडू रिटेन करणेबाबत आयपीएलचे नियम
आयपीएलच्या मेगा लिलावात कोणतीही फ्रॅंचाईजी तीन खेळाडू रिटेन करू शकते. तसेच, दोन खेळाडू आरटीएमने पुन्हा आपल्या संघात सामील करून घेऊ शकते. २०२२ मध्ये आयपीएल संघांची संख्या १० करण्यात येणार असल्याने, त्या वर्षी खेळाडूंचा मेगा लिलाव पार पडेल.
महत्वाच्या बातम्या:
ओए बॅट दिखा, बॅट! अर्धशतक झळकावलं अन् इशानला पत्त्याच नाही, मग विराटनं केलं असं काही
ब्रेकिंग! जसप्रीत बुमराह चढला बोहल्यावर, लग्नातील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
अफगानी स्पिनर राशिद खानने रचला इतिहास, ठरला २१ व्या शतकातील विश्वविक्रमी गोलंदाज