श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यानंतर टी -२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने मंगळवारी (१४ सप्टेंबर) सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे आता तो मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.
आपल्या निवृत्तीबद्दल माहिती देताना तो म्हणाला, ‘मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. माझ्या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या आणि साथ देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. पुढील वर्षांमध्ये मी माझा अनुभव युवा क्रिकेटपटूंना देऊ इच्छितो.’ मलिंगाच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, तो लवकरच प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतो.
त्याच्या या घोषणेनंतर, आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने त्यांच्या चॅम्पियन गोलंदाजाला विशेष आणि खास पद्धतीने निरोप दिला आहे.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर मलिंगाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात मुंबईचा आक्रमक फलंदाज कॅरॉन पोलार्ड त्याला खांद्यावर घेऊन जात आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट केले की, ‘फलंदाजांची बोटे चिरडण्यापासून ते त्यांच्या खांद्यावर बसण्यापर्यंत, मलिंगाने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वकाही साध्य केले आहे. निवृत्तीच्या निमित्ताने एकच सांगू शकतो, धन्यवाद मलिंगा.’
From crushing batsmen's toes to getting lifted on shoulders, Mali achieved everything in T20s. ????????
As he announces his retirement from T20 cricket, we just have three words to say – ????????????????????. ????????????. ????????????????????????????. ????#OneFamily #MumbaiIndians @ninety9sl pic.twitter.com/5HWV4Tj5zS
— Mumbai Indians (@mipaltan) September 14, 2021
मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवले आहे. त्यातील ४ विजेतीपदं मिळवण्यात मलिंगाचा मोलाचा वाटा आहे. मलिंगाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. यासोबतच त्याने आयपीएलमध्ये १७० विकेट्स देखील घेतल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात मलिंगाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने १३ धावांत पाच बळी घेत सर्वोत्तम कामगिरी देखील केली होती.
मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आश्चर्यकारक विक्रम देखील केले आहेत. यात त्याने दोनदा, ४ चेंडूंत सलग ४ बळी घेतले आहेत. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन वेळा हॅट्रिक घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण पाच वेळा हॅट्रिक घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० क्रमवारी: विराटने घेतली चौथ्या स्थानी झेप, रोहित टॉप-२० मध्येही नाही
एक, दोन नव्हे, तर तब्बल ५ वेळेस हॅट्रिकचा कारनामा, मलिंगाचे ‘हे’ मोठे विक्रम तोडणे अशक्यच
चहल म्हणतोय, ‘मला आरसीबीमधून निवृत्त व्हायचंय आणि माझं स्वप्न असेल की…’





