---Advertisement---

WPLच्या पहिल्या सामन्यात मुंबईने गुजरातला चोप-चोप चोपलं, हरमनसेनेचे जायंट्सपुढं 208 धावांचं आव्हान

On: शनिवार, मार्च 4, 2023 9:35 PM
Harmanpreet-Kaur
---Advertisement---

शनिवारी (दि. 4 मार्च) नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघ आमने- सामने होते. या सामन्यात नाणेफेक जिंकत गुजरात गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबईने कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या अर्धशतकाच्या जोरावर 200हून अधिक धावसंख्या उभारत गुजरातपुढे भले मोठे आव्हान ठेवले.

या सामन्यात गुजरात जायंट्स (Gujarat Giants) संघाची कर्णधार बेथ मूनी (Beth Mooney) हिने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या खेळाडूंनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. यावेळी मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 207 धावा चोपल्या. तसेच, गुजरात संघापुढे 208 धावांचे आव्हान ठेवले.

https://twitter.com/wplt20/status/1632050297743745027

नक्की वाचा- पहिली ओव्हर, पहिली विकेट, पहिली धाव अन् पहिला षटकार, वाचा WPLमधील खेळाडूंची पहिली-वहिली कामगिरी

या सामन्यात मुंबईकडून फलंदाजी करताना कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने सर्वाधिक धावा चोपल्या. तिने यावेळी 30 चेंडूत 65 धावा केल्या. या धावा करताना तिने 14 चौकारांचा पाऊसही पाडला. तिच्याव्यतिरिक्त मुंबईसाठी हेली मॅथ्यूज (47) आणि अमेलिया केर (नाबाद 44) यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच, नॅट सायव्हर- ब्रंट हिनेदेखील 23 धावा केल्या. याव्यतिरिक्त तीन फलंदाजांना 20 धावांचा आकडा पार करता आला नाही.

https://twitter.com/mipaltan/status/1632050905146359808

यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना स्नेह राणा हिने गोलंदाजीची जादू दाखवली. तिने सर्वाधिक 2 विकेट्स नावावर केल्या. तिने यादरम्यान 4 षटके गोलंदाजी करताना 43 धावा खर्च करत ही कामगिरी केली. तिच्याव्यतिरिक्त ऍशले गार्डनर, तनुजा कंवर आणि जॉर्जिया वेरेहम यांनी प्रत्येकी एक विकेट नावावर केली. विशेष म्हणजे, तनुजा हिच्या नावावर स्पर्धेची पहिली विकेट घेण्याचा विक्रम नोंदवला गेला. तिने यष्टीरक्षक यास्तिका भाटिया हिला 1 धावेवर तंबूत धाडण्याचा पराक्रम गाजवला.

अशात आता मुंबईचे 208 धावांचे हे आव्हान गुजरात संघ पार करतो का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. (Mumbai Indians women score 207 runs Gujarat Giants needs 208 runs to win)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिली ओव्हर, पहिली विकेट, पहिली धाव अन् पहिला षटकार, वाचा WPLमधील खेळाडूंची पहिली-वहिली कामगिरी
WPL 2023: उद्घाटनाच्या सामन्यात नाण्याचे नशीब गुजरातच्या बाजूने, मुंबईची प्रथम फलंदाजी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---