महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 19वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघात पार पडला. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तसेच, मुंबईने स्पर्धेतील सहावा विजय मिळवत गुणतालिकेतील अव्वलस्थान गाठले.
या सामन्यात हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबईच्या खेळाडूंनी सार्थ ठरवला. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 125 धावा केल्या होत्या. हे आव्हान पार करताना मुंबईच्या खेळाडूंनी 16.3 षटकात 129 धावा केल्या आणि 4 विकेट्सने सामना खिशात घातला.
https://twitter.com/mipaltan/status/1638166571150372867
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून या आव्हानाचा पाठलाग करताना अमेलिया केर हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने 27 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. तिच्याव्यतिरिक्त यास्तिका भाटिया (30), हेली मॅथ्यूज (24), पूजा वस्त्राकर (19) आणि नॅट सायव्हर-ब्रंट (13) यांंनीही विजयात मोलाचा वाटा उचलला.
यावेळी आरसीबीकडून गोलंदाजी करताना कनिका अहुजा हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 1 षटक गोलंदाजी करताना 5 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त मेगन शट, श्रेयांका पाटील, एलिस पेरी, आशा शोभना यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरच्या फक्त तीन खेळाडूंना 20 धावांचा आकडा पार करता आला. त्यामध्ये ऋचा घोषच्या 29, एलिस पेरीच्या 29 आणि कर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिच्या 24 धावांचा समावेश होता. यांच्याव्यतिरिक्त हीदर नाईट आणि कनिका अहुजा यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. इतर कुणालाही खास कामगिरी करता आला नाही.
यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना अमेलिया केर हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 4 षटके गोलंदाजी करताना 22 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त इझी वोंग आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, सायका इशाक हिनेही 1 विकेट नावावर केली.
या विजयानंतर मुंबई संघ 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे. (Mumbai Indians Women won by 4 wkts)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 सुरू होण्यापूर्वीच मुंबईचा चाहत्यांना धक्का, दिली दोन पाकिस्तानी खेळाडूंना संधी
ना लाखो रुपये, ना कुठली गाडी! विलियम्सनला मालिकावीर पुरस्कारासाठी मिळालं भुवया उंचावणारं बक्षीस, पाहाच






