शुक्रवारी (दि. ०६ मे) गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२२मधील ५१व्या सामन्यात आमने- सामने होते. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबई संघाने ५ धावांनी सामना आपल्या खिशात घातला. हा मुंबईचा हंगामातील दुसराच विजय होता. मुंबईच्या विजयाचा हिरो डॅनियल सॅम्स ठरला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी मुंबईने फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १७७ धावा चोपल्या आणि गुजरातपुढे १७८ धावांचे आव्हान उभे केले होते. जे गुजरात संघाला पार करता आले नाही. त्यांना ५ विकेट्स गमावत फक्त १७२ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईने ५ धावांनी सामना खिशात घातला.
WE WIN!!!!! 💙💙💙
— Mumbai Indians (@mipaltan) May 6, 2022
गुजरातकडून फलंदाजी करताना वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल या सलामीवीरांनी शानदार फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. साहाने ४० चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या. तसेच, गिलने ३६ चेंडूत ५२ धावा चोपल्या. या धावा करताना त्यानेही २ षटकार आणि ६ चौकारांचा पाऊस पाडला. त्यांच्याव्यतिरिक्त फक्त कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यालाच २४ धावा करता आल्या. बाकीच्या एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही.
Match 51. Mumbai Indians Won by 5 Run(s) https://t.co/2bqbwTpDDK #GTvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2022
यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना मुरुगन अश्विनने लक्षवेधी गोलंदाजी केली. त्याने गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडले. तसेच, कायरन पोलार्डनेही १ विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने चांगली कामगिरी केली. मागील सामन्यांपासून धावांसाठी झगडणाऱ्या किशनची बॅट या सामन्यात तळपली. मात्र, त्याला अर्धशतक करता आले नाही. त्याने २९ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ४५ धावा केल्या. त्याच्यासोबतच टीम डेविडने ४४, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने ४३ आणि तिलक वर्मा याने २१ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त कुणालाच २० धावांचा आकडा पार करता आला नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना राशिद खानने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना फक्त २४ धावा देत २ विकेट्स आपल्या खात्यात जोडल्या. याव्यतिरिक्त अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन आणि प्रदीप सांगवान यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
या पराभवानंतरही गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम आहे. तसेच, दुसरीकडे मुंबईने विजय मिळवूनही ते गुणतालिकेत तळाशी आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितच्या शानदार सिक्सरमुळे काझीरंगातील गेंड्यांना ५ लाखांची मदत; कशी ते एका क्लिकवर घ्या जाणून
शेवटी रोहितची बॅट तळपलीच! विस्फोटक फलंदाजी करत ‘हिटमॅन’ बनला मुंबईचा दुसरा ‘सिक्सर किंग’
‘तू पुढच्या वर्षी गुजरातमध्ये येऊ शकतो’, हार्दिक पंड्याची मुंबईच्या जुन्या सहकाऱ्याला खुली ऑफर