शनिवारी (१६ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२०च्या ३२व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या नवनियुक्त कर्णधार ओएन मॉर्गनच्या हाती अपयश आले. कारण या सामन्यात मुंबई इंडियन्सने फलंदाजी आणि गोलंदाजीत दमदार प्रदर्शन करत कोलकाताला ८ धावांनी पराभूत केले. यासह मुंबईने हंगामातील ६वा सामना जिंकत पुन्हा गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर ताबा मिळवला.
नाणेफेक जिंकत कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी निवडली होती आणि २० षटकात ५ विकेट्स गमावत १४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल मुंबई संघाने १६.५ षटकातच २ बाद १४९ धावा केल्या आणि ८ विकेट्सने सामना खिशात घातला.
मुंबईकडून फलंदाजी करताना यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ७८ धावा केल्या. त्याने सलामीला फलंदाजीला येत ४४ चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकार मारत ही धावसंख्या गाठली. त्याच्याव्यतिरिक्त संघाच्या विजयात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने ३५ धावा आणि अष्टपैलू हार्दिक पंड्याने २१ धावांचे योगदान दिले.
कोलकाताच्या गोलंदाजांना जास्त चांगली कामगिरी करता आली नाही. वरुण चक्रवर्ती आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. उर्वरित एकही गोलंदाज मुंबईच्या फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी ठरू शकला नाही. शिवाय फिरकीपटू प्रसिद्ध कृष्णाने अत्यंत महागडी गोलंदाजी केली. त्याने २ षटके टाकत ३० धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही.
तत्पुर्वी प्रथम फलंदाजासाठी आलेल्या कोलकाता संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. त्यांनी पावरप्लेमध्येच राहुल त्रिपाठी आणि नितिश राणाची महत्त्वपूर्ण विकेट गमावली. तर कोलकाताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि अष्टपैलू आंद्रे रसेलही १२ षटकांच्या आत पव्हेलियनला परतले. कोलकाताकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ५३ धावा केल्या. तसेच कर्णधार ओएन मॉर्गननेही ३९ धावा केल्या.
मुंबईकडून गोलंदाजी करताना राहुल चाहरने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन केल. त्याने ४ षटकात फक्त १८ धावा देत कोलकाताच्या २ फलंदाजांचा बाद केले. तर ट्रेंट बोल्ट, नाथन कॉल्टर-नाईल आणि जसप्रीत बुमराह यांनीही प्रत्येकी एका विकेटची आपल्या खात्यात नोंद केली.
महत्त्वाच्या बातम्या-
मी काहीही केलंच नाही! तुषार देशपांडेला धक्का दिल्यामुळे श्रेयस झाला ट्रोल
मिताली राजच्या संघातील खेळाडूला कोरोनाची लागण; महिला आयपीएलमधील सहभागावर प्रश्नचिन्ह
ये हुई ना बात! सूर्यकुमारची ‘स्काय’ जंप आणि केकेआर चिंतेत, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष
यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे
आयपीएलमधील १० विक्रम, ज्यांना मोडणे आहे कठीण